Pages

Tuesday, 16 June 2015

उद्योग करतांना टीका आणि नाकारला कसे सामोरे जाल

उद्योग करतांना टीका आणि नाकारला कसे सामोरे जाल

Criticism.jpg

गेल्या आठवड्यात प्रताप भेटला. पाठीवर sack , हातात फोल्डर आणि गळ्यात टाय. चांगला रुबाबदार दिसत होता पण चेहऱ्यावर हरवल्याचे भाव होते . मी अगदी समोर जाऊन उभा राहिलो तरी लक्ष नव्हत. थोड बोलणं झल्यावर लक्षात आले कि त्याने स्वतःचा कुरियर चा व्यवसाय बंद करून एका फायनान्स कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी धरली आहे . खूप दुख्खी वाटत होता. हताश झाला होता . व्यवसाय का बंद केला विचारले तर म्हणाला , त्याच्या बरोबरचे मित्र चिडवतात. डिप्लोमा इंजिनियर असून हि कुरिअर चालवतो . वेळ पडली तर स्वतः डिलिवरी करत हिंडतो. मामा तर म्हणाला "चांगली नोकरी करायची सोडून लोकांची दर पुजत फिरतो . भिकेचे डोहाळे लागलेत याला" . आई काही बोलत नाही, पण काहीच बोलत नाही नुसती रडत असते. मी व्यवसाय नाही तर काही गुन्हा करतोय  असे सगळे वागत होते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसात कमावलेले सगळे पैसे पुन्हा व्यवसायातच पुन्हा गुंतवावे लागतात पण हे सांगून कुणालाही काळात नव्हते. शेवटी बंद केले सगळं आणि सरळ हि नोकरी धरली . पण इथेही लक्ष लागत नाही . नुसती घुसमट होतेय . हे सगळ बोलतांना अगदी गुदमरला होता तो . मी थोडा वेळ त्याची सांत्वना केली व निरोप घेतला. त्या रात्र्ती मलाही झोप आली नाही . प्रताप सारखे असे अनेक युवक असतील. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतील . मोठ्ठा उद्योजक व्हायचे ध्येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतील. पण जवळच्या लोकांच्या टीका , उद्योगात सतत मिळणारे रिजेक्शन आणि मानसिक त्रासाला वैतागून  स्वतःचे स्वप्न विसरून समाजाला मान्य असणार्या सरळ रस्त्याने आयुष्य जगायला लागत असतील. तसं  टीका आणि नकार हे उद्योजकांसाठी काही नवी बाब नाही. अगदी प्रत्येक उद्योजकाला याला सामोरे जावे लागते असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही , आणि अनेक उद्योजकांनी , वाय्व्सायीकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग हि शोधले आहेत. पण नवीन उद्योजकांना ते माहित नसतात आणि मग प्रताप सारखा अनेकांचा बळी जातो.  प्रतापला टीकांना आणि नाकारला सामोरे कसे जावे सांगायचे होते पण त्या वेळी तो ऐकण्याच्या मानास्तीत नव्हता आणि ते ठिकाणही नव्हते. वेळाही निघून गेली होती. मला एका गोष्टीची खात्री मात्र आहे. प्रताप नोकरी जास्त दिवस करू शकणार नाही . त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून एइल आणि पुन्हा तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करेल. पण बराच वेळ आणि संधी या प्रवासात वाया जाईल . उद्योग , व्यवसाय करु पाहणाऱ्या अनेक प्रतापांचे नुकसान होऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न .

१. टिके कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.


perception-6-638.jpg

उद्योजक मित्रांनो वरील चित्रात कोणाला जख्ख म्हातारी दिसत असेल तर कुणाला २० वर्षाची तरुणी . चित्र एकाच आहे पण आपण त्या चित्राकडे कसे पाहतो त्यावर  आपल्याला काय बोध होतो ते ठरते . याचाच अर्थ असा हि होतो कि आपण जे पाहतो ऐकतो त्याचा आपण कसा अर्थ लावतो त्यावर त्या घटनेचा आपल्यावर काय परिणाम होईल हे ठरते . उद्योग करत असतांना आपल्यावर टीका करणारे बहुतेक आपले आप्तेस्ट किंवा मित्रापारीवारापैकी असतात. या व्यक्ती जेव्हा तुमच्या स्थिती कडे पाहतात तेव्हा ते बाहेरून स्थिती कडे पाहत असतात . तुमची आणि त्यांची परिथिती कडे पाहण्याची दिशा परस्पर विरोधी असल्याने , बाहेरून आत पाहणार्यांना जे दिसते आणि तुम्ही   ज्याठिकाणी उभे राहून पाहता आणि तुम्हाला दिसणारे दृश्य (Vision ) यात बराच फरक असतो. आणि खार म्हन्जे  तुमच्या स्वप्नाबद्दल सर्वात महत्वाच मत जर कुणाचं असेल तर ते फक्त तुमचाच असू शकतं . इतरांच्या नकारार्थी टिप्पण्या ह्या त्यांच्या मर्यादांचे प्रतिबिंब असते , तुमच्या नव्हे . दुसरा महत्वाचा भाग असा कि टीका टिप्पणी करणार्यांचा हेतू काय आहे हे हि जाणून घेणे गरजेचे आहे. कुणी तुमच्यावरील अति लोभामुळे आणि काळजी पोटी बोलत असेल तर कुणी तुमच्याबद्दल असणार्या मत्सरा मुळे बोलत असेल. इंग्रजीत एक नवीन शब्द आला आहे Frenimy म्हणजेच मित्राच्या रूपातील वैरी. दोन्ही हि परिस्थितीत जर टीका तीपान्निना घाबरून अथवा वैतागून जर तुम्ही चीकीचे पाऊल उचलले तर एक तर अप्तेस्टनचे व स्वतःचे नुकसान कराल किंवा वैरयाला अपेक्षित कृती कराल .

२. तुम्ही परिपूर्ण (perfect ) नाही  याची जाणीव बाळगा .

superman.png

“Nobody is perfect, if you think you are perfect then you are Nobody”प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात त्या प्रमाणे तुमचे हि काही दोष असू शकतात . स्वप्नावेडे होऊन मार्गक्रमण करतांना स्वतःच्या दोषां कडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते . अशावेळेला आपल्यावर होणार्या टीका आणि rejections आपणास आपल्या दोषांची जाणीव करून देऊ शकतात. थोडेसे सिंव्हावालोकन (Introspection ) केल्यास आपणास हे दोष जाणवतात आणि एकदा जाणीव झाली कि ते सुधारणे सोपे होते. त्यामुळे टीकांना नकारार्थी घेण्याऐवजी त्यातून सुधारण्याचे धडे शिकणे अधिक फायदेशीर ठरेल . बराच टिकांच्या रुपात आलेल्या सुधारणेच्या सूचना परिस्थिती मुळे लगेच अंगीकारणे शक्य नसते . पण आपणास या सुधारणा करायच्या आहेत हा विचार मनात ठेऊन केलेला प्रवास जास्त यशस्वी ठरतो .  

३ सगळ्याच गोष्टी मनाला लाऊन घ्यायच्या नसतात .

taking it personally.jpg

अनेकदा सेलेक्टीवे लिस्टनिंग चा वापर
अनेक यशस्वी लोकं करतात . याचाच अर्थ आपणास उपयुक्त गोष्टी ऐकणे वर त्यावर अंबलबजावणी कारण आणि ज्या गोष्टी नको असतील त्यांना ऐकणे पण दुर्लक्षित करणे . या युक्तीचा वापर केल्याने आपण स्वतःला निराशे पासून तर वाचवतोच पण अनेक वेळा वाद हि टाळता येतात . निराशेत अथवा वादावादीत वय जाणारा वेळ व शक्ती वाचते . अनेकदा एखादी टीका अथवा नकार आपणाला मिळाली कि आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो अथवा तसा सातत्याने प्रयत्न करतो . अनेक अशा परिस्थिती असतात ज्यांचे उपाय काही वेळ जाऊ दिल्यास आपोआपच होतो .मित्रांनो या जगात काही वेगळ करण्याची इच्छा बालाग्नार्यांना नेहमीच टीकांना आणि नाकारांना सामोरे जावे लगले . जे . के. रोव्लिंग , ह्यारी पौटेर ची सुप्रसिद्ध लेखिकेला पहिले पुस्तक प्रकाशित होण्या आधी १२ वेळा नाकारला सामोरे जावे लागले . संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक टीका सहन करतच जगाला ज्ञानेश्वरी द्यावी लागली . अगदी तत्कालीन उदाहरण घ्यायचे तर भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेक तिकांना सामोरे जावे लागले आणि अजूनही टीका होत आहेत . टीकांना आणि नाकारांना घाबरून जाऊ नका . जागरूक पाने जर या टीकांचा स्वीकार करून सुधार घडवले तर तुमचे स्वप्न सत्यात उतरवणे शक्य आहे तुमच्या स्वप्नांसाठी हार्दिक शुभेच्छा

कुंदन गुरव 20150525_100624.jpgTransGanizer kundan@transganization.com