Pages

Wednesday, 19 November 2014

आकडेमोड आणि तुमचा उद्योग. - Article by कुंदन गुरव

एका उद्योजक मित्राला मी सहज प्रश्न विचारला "तुझ्या उद्योगाचा turnover किती?" लगेच उत्तर आले ५० लाख . त्या पुढचा माझा प्रश्न होता Gross Profit कीती? तो थोडासा गोंधळला . थोडा विचार करून त्याने एक संख्या सांगितली . मला ती खारी वाटली नाही म्हणून मी त्याला विचारले अच्छा Pbt (profit before Tax ) कीती? आणि PAT (Profit after tax ) किति? तो अजूनच गोंधळला . मग आणखी मोठ्ठा प्रश्न EBIDTA (Earnings Before Interest , depreciation , Tax and amortization कीती? आत्ता मात्र त्याची तारांबळ पाहण्यासारखी होति. हे प्रश्न त्याची मजा घेण्यासाठी नव्हते पण त्याला खरोखर मदत करण्याच्या इच्छेने विचारले होते. हा लेख पुढे वाचण्या आधी तुम्ही हि हे प्रश्न स्वतःला विचारा. उडूद्या थोडा गोंधळ उडला तर . 

Balance Sheet पाहताय का?, नका पाहू त्यात खरी उत्तरं मिळणार नाहीत . आपण सर्वांना आपल्या Balance Sheet ची सत्यता माहित आहे . 

Balance sheet हि CA ने बनवण्याचा दस्तऐवज आहे. income tax department ला दाखवावा लागतो म्हणून आम्ही ते बनवतो. CA ला एकदा brief दिली कि तो बघून घेईल काय कराचे ते . माझ तर डोकच फिरत accounting म्हंटला कि अशी अनेक वाक्य आपण उद्योजकांच्या तोंडी नेहमी ऐकतो . आज या लेखात आपण आकड्यांच आपल्या उद्योगाच्या वाढीतला संबंध पाहू आणि कोणते महत्वाचे आकडे आपण स्वतः Monitor करणे आवश्यक आहे ते पाहूया. 

आपण उद्योजक सारेच स्वप्नवेडे असतो . कुणी भरपूर पैसे कमवायचे स्वप्न पाहतो तर कुणी उत्तम product बनवून स्वतःची खास ओळख निर्माण करण्याच्या ध्येयाने पेटलेला असतो . कुणाला स्वतःच्या कार्याने अखंड समाज बदलायचा असतो तर कुणी इतरांना रोजगार कसा मिळेल यासाठी धडपडत असतो. उद्योगाचा उद्देश जरी सरळ समाजसेवी दिसत नसला आणि तो स्वार्थी दिसत असला तरी प्रत्येक यशस्वी उद्योग समाजातील अनेक घटकांवर प्रभाव टाकत असातो. जेव्हा जेव्हा मोट्ठे अवार्ड फंक्शन होतात त्या वर केला जाणारा खर्च पाहून माझे वडील नेहमी वैतागतात. त्यांच्या दृष्टीने हा पैशाचा व्यय अहे. आता असे कार्यक्रम व्हावेत किंवा होऊ नयेत याही पेक्षा या कार्याक्रमा मुळे किती लोकांना रोजगार मिळाला याचाच विचार माझ्या मनात असतो. आता हि तुमची स्वप्न पूर्ण करत असताना अनेकांची स्वप्न अथवा गरजा जर पूर्ण होणार असतील तर त्याच व्यवस्थापन उत्तम रित्या होण खूप गरजेच आहे . 

उद्योगाच्या व्यवस्थापनात आर्थिक व्यवस्थापनाला सर्वात अधिक महत्व देणे हरजेचे आहे. 

मी स्वतः अशा अनेक उद्योजकांना भेटलो आहे ज्यांचा उद्योग प्रथमदर्शी पाहता उत्तम वाटतो . त्या उद्योजकाला वाटत असते आम्ही नफा करतो आहे पण शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी केल्यावर लक्षात येते कि वास्ताविक पाहता गेली तीन वर्ष उद्योगात नुकसान होते आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईतील एक अतिशय नावाजलेली real estate कंपनी. अनेक project parelally करणारी. वर्षाखेरीस उद्योगात तसा पहिला तर नफा दिसत होता पण जेव्हा त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने एका एका प्रोजेक्ट चे आर्थिक विश्लेषण केले तेव्हा लक्षात आले कि त्यांचा एक महात्वात्च्या प्रोजेक्ट मध्ये सगळे गाळे विकल्यानंतर त्यांना फक्त शेवटचा गाळा विकल्यावर त्या एका गाळ्याची जी किंमत मिळेल तोच त्यांचा नफा. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या कंपनीला हे लक्षात कसे आले नहि. याच गूढ लपले आहे तुम्ही Net Profit कसे calculate करता यावर. 

आणखी एक उद्योजक मित्र imitation jewelry बनविण्याच उद्योग करतात. त्यांना. अनेक वर्ष उद्योग करूनही आपण नक्की किती टक्के नफा कमावतोय हे छातीठोक पाने सांगता येत नहि. धंदा और जिंदगी मस्त चल राही ही हे त्यांचे उत्तर. एकदा मी त्यांना विचारले " आप धंदे के लिये ये जो ७ गाले वापर राहे हो इंनका रेंट कितना दे ते हो ?" उत्तर आले " अरे भाडा कीस बात का ये तो अपनी हि जगह है . मी विचारल "अगर भाडा देणा पडता तो?" थोडा वेळ ते गप्पा बसले आणि लख्ख प्रकाश पडल्या सारखे म्हणाले . " धंदे की बुनियाद हि हिल जायेगी, अगर मी फ्याक्टरी कही और लोकेशन ले जाऊ तो इस जगह से अने वाला भडा मेरे profit इतनाही होगा . मतलब मी इस धन्देमे जोखीम लेकर अपने आप को सिर्फ व्यस्त रख रहा हु और खुश हो राहा हु कि मै Business कर राहा हु ". या संभाषणा नंतर आम्ही त्याचं संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन केलं. आज त्यांची फ्याक्टरी मुंबईत नसून वाड्याला अहे. office industrial गाळ्यातून commercial complex मध्ये आहे . उलाढाल वाढली आणि नक्की किती टक्के निव्वळ नफा होतो हे हि त्यांना माहित अहे. हे सर्व उद्योगातील काही महत्वाचे आकडे नियमित Monitor केल्याने शक्य झाले. 

अर्थक्षेत्रातील तज्ञ काय सुचवतात त्या हि पेक्षा उद्योजक म्हणून मला वाटते प्रत्येक उद्योजकाकडे स्वतःचे Management Account असणे महत्वाचे 

उदाहरण : Revenu ( उलाढाल) - वजा Direct Cost (उत्पादनासाठी लागणारा खर्च ) = Gross Profit ढोबळ नफा 

Revenue किंवा Top line म्हणजे एका ठराविक कालावधीत मिळवलेले पैसे ज्यात कंपनीने दिलेली सुठ व returned Goods च्या किमतीचा हि समावेश असतो वजा Direct Cost म्हणजे उत्पादना साठी लागणारे कच्चा माल , मनुष्य बळ , विक्री खर्च (sales cost Not marketing )आणि असे खर्च जे फक्त त्या उत्पदाच्या उत्पादनाशी निगडीत आहेत. =

Gross Profit ढोबळ नफा हि एक अशी संख्या आहे ज्यातून अजून फक्त उत्पादनासाठी आणि उत्पाद विकण्यासाठीचा खर्च वजा केला आहे . हे साधे गणित करत असतांना उद्योजकाला उत्पादनासाठी लागणाऱ्या एकंदरीत खर्च समजतो . यातील कोणता खर्च कमी अथवा टाळता येऊ शकतो यावर लक्ष केंद्रित होते. मी जेव्हा सुरुवातीला उत्पाद बनवले त्यावेळेला काही assumptions गृहिते मांडली होती ती गृहिते अजूनही तशीच आहेत कि त्यात बदल झाला आहे ? जर त्यात बदल झाला आहे तर माझी Production Cost वाढली आहे का ? याचा माझ्या प्रोदुक्ट्च्या किंमतीवर काय परिणाम होईल ? जर मी किंमत वाढवली तर माझा ग्राहक वर्ग त्याला स्वीकारेल का ? मला माझ्या विक्रीच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्योजक या छोट्याश्या analysis ने मिळवू शकतात. 

एकदा तुमचा Gross Profit लक्षात आला कि मग त्यातून Indirect Cost वजा केली कि तुम्हाला Pbt म्हणजेच Profit Before Tax मिळेल. Indirect cost म्हणजे, असा खर्च जो एखाद्या product किंवा प्रोजेक्टला assign नेमता येत नाही . उदाहरणार्थ तुमच्या कारखान्याचे भाडे , administration (प्रशासन ) खर्च , Security (सुरक्षा ) खर्च. हे खर्च ठराविक (fixed ) अथवा Variable असू शकतात. एकदा Pbt लक्षात आला कि मग त्यातून इंटरेस्ट, Depreciation , Tax , आणि amortization वजा केले कि तुमचा Net Profit तुम्हाला मिळतो. 

आता यातील इंटरेस्ट आणि ट्याक्स calculate करणे तसे सोपे आहे पण Depreciation आणि amortization समजून घेणे गरजेचे आहे. हे दोन्ही खर्च बहुदा कॅपिटल investments किंवा अशा खर्चांसाठी असतात ज्याचा उपयोग हा एका पेक्षा अधिक आर्थिक वर्षात होणार असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर कारखाना बनवला तर त्याचा खर्च एका वर्षात कमावणे शक्य नसते आणि कारखान्याची उपयोगिता हि अनेक वर्षाची अस्ते. त्याच प्रमाणे जर तुम्ही एखादे मार्केटिंग क्याम्पेन केले असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला अनेक वर्ष मिळणार असतात. अशावेळेला हा खर्च एकवार्षाच्या जमाखर्चात धरल्यास न्याय्य तारणार नाही , म्हणून हा खर्च विशिष्ट वर्षांमध्ये समान अथवा वेगवेगळ्या प्रमाणात वाटला जातो. 

जेव्हा एखाद्या प्रकट Tangible ( यंत्र, कारखाना) अशा मालमत्तेचा खर्च विभागला जातो त्याला depreciation म्हणतात आणि जेव्हा intangible अप्रकट (मार्केटिंग, advertising , Branding, Intellectual property ) यांचे amortization केले जाते .

मित्रांनो थोडासा management Accounting चा अभ्यास केल्यास आपणही आपल्या उद्योगातील अनेक खाचखळगे उळाखू शकतो , वेळच्या वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि उद्योगाची sustainable वाढ करू शकतो . 

- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 


3 comments:

  1. सर अतिशय सुंदर लिहिलं आहे । पण ब्लॅक अँड व्हाईट साठी काही ऑप्शन सांगा प्रॉपर्टी मार्केट साठी

    ReplyDelete
  2. सर अतिशय सुंदर लिहिलं आहे । पण ब्लॅक अँड व्हाईट साठी काही ऑप्शन सांगा प्रॉपर्टी मार्केट साठी

    ReplyDelete