Pages

Monday, 10 November 2014

उद्योगात नवीन कल्पनांचे संगोपण आणि अंबलबजावणी कशी कराल? - Article by कुंदन गुरव

उद्योग सुरु केल्यावर त्याला यशस्वी करण्यासाठी उद्योजक नेहमी नवनवीन कल्पनांच्या शोधत असतात . या नवीन कल्पना कधी product /services च्या रूपाने तर कधी काम करण्याच्या पद्धतीच्या रूपाने अस्तित्वात येत असतात. या नवीन कल्पना कधी उद्योजकाच्या अंतःप्रेरणेतून (Intuition) मधून निर्माण होतात तर कधी industry trends मधून उदभवतात. रोज वर्तमान पत्रे , ntworking , industry reports अशा अनेक माध्यमातील माहितीच्या आधारे या नवीन कल्पना उद्योजकाच्या मनात निर्माण होत असतात. प्रत्येक नवीन कल्पनेच्या मागे उद्योग विकासाची संधी उद्योजकाला दिसत असते आणि म्हणूनच तो प्रत्येक नवीन कल्पनेबद्दल अतिशय प्रेरित असतो . बाब अगदी खरी आहे कि "an idea can change your life" एक कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते पण त्या कल्पनेचं व्यवस्तीत संगोपन आणि अंबलबजावणी नाही झाली तर करोडोंची कल्पना काडीमोल हि ठरू शकते. याही पुढे जाऊन मी म्हणेन तुमच्या कल्पनेचा फायदा तुम्हाला न होता दुसराच त्याची फळे उपभोगेल . "Steal Ideas shamelessly" अशी एक म्हण उद्योग जगात प्रचलित आहे . म्हणूनच आजच्या लेखात नवीन कल्पनांचे संगोपण आणि व्यवस्थित अंबलबजावणी कशी करावी यावर माझे विचार मांडणार आहे . 
पुढील गोष्टी टाळ

Hazard Blindness

“He’s as blind as he can be, just sees what he wants to see” John Lennon या सुप्रसिध्द पाश्च्यात गायकाने त्याच्या एका गाण्यात हे वाक्य म्हंटल अहे. Hazard Blindness हा आजार बहुतेक उद्योजकांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतोच. जेव्हा जेव्हा नवीन संधी दिसते तेव्हा तेव्हा हा आजार उफाळून येतो. समोर दिसणाऱ्या संधीत उद्योजक फक्त त्याला पहाव्याशा वाटणार्या गोष्टीच पहतो. संधीच्या भव्यते मद्धे आणि त्यातून होणार्या फायद्याच्या गणितात तो एवढा रंगून जातो कि संधीबरोबर येणाऱ्या जोखामिकडे जवळ जवळ दुर्लक्ष्य करतो. छोट्या छोट्या वाटणाऱ्या प्रतिकूल गोष्टी नवीन कल्पनेच्या अंमलबजावणीत मोठ्या अडचणी म्हणून उभ्या राहतात आणि मग त्या नवीन कल्पनेतून अपेक्षित परिणाम साधता येत नहित. या अपयशाचा जसा प्रतिकूल पारणं उद्योजाकावर होतो तसाच याचा परिणाम सघटनेत काम करणाऱ्या कामांच्यावर देखील होतो. असे प्रकार वारंवार होऊ लागले कि साहजिकच कर्मचाऱ्यांचा नवीन काही करण्याचा उत्साह संपून जातो आणि याचे परिणाम उद्योजकाला पर्यायाने उद्योगाला भोगावे लागतात .

knee jerk action. विचारहीन कृती

एखाद्या source मधून एखादी उद्योग उपयुक्त माहिती मिळाली कि उद्योजकाचे त्या अनुशंघाने विचार चक्र सुरु होते आणि या विचार चक्रातून नवीन कल्पना निर्माण होतात . वास्तविक पाहता अशा प्रकारे नवीन कल्पना निर्माण करणे हे उद्योजकासाठी अतिशय महत्वाचे आहे पण या कल्पनांचा मेदूत उगम झाल्यानंतर त्यावर काम कशा पद्धतीने होते हे त्या कल्पनेच्या यशस्वी अथवा अपयशी होणे ठरवते . माझे mentor आणि Meru cab कंपनीचे संचालक नीरज गुप्ता नेहमी म्हणतात "implementation is as important rather far important than idealization " सकाळी वर्तमानपत्रात अथवा tv वरची एखादी बातमी ऐकून उद्योजक ऑफिसला पोह्चला कि लगेच घोषणा करून टाकतो आज पासून आपण हि नवीन गोष्ट अमलात आणणार आहोत. कोणाचाही विचार सहभागी न करता केलेली हि घोषणा सगळ्यांनाच पटते असे नाही साहजिकच हा असा अचानक मिळालेल्या धक्क्याला कोणीही तयार नसते आणि मग अंमलबजावणीत अनेक त्रुटी आढळतात. चांगली कल्पना अपयशी ठरते .

कोणतीही नवीन कल्पना अपेक्षित रित्या अम्बालाबाजावणी करून यशस्वी करायची असेल तर ती नियोजान्बाध्ध पद्धतीने साकारली पाहिजे. नवीन कल्पना मग ती नवीन Product / Project / Service अथवा काम करण्याची पद्धत या पैकी कोणतीही असो pilot पद्धतीने केल्यास त्याची अपेक्षित आणि परिणामकारक निष्पत्ती प्राप्त होते .

Piloting

Piloting चा सरळ सोपा अर्थ आहे चाचणी अथवा एखाद्या मोठ्या कार्याचे छोटे रूप. परीक्षणासाठी केलेली कृती . अशा प्रकारची चाचणी साठी केलेली कृती संभावित अडथळे ओळखण्यास , अडथळ्यांना वेळीच दुर करण्या साठी आणि छोटे अडथळे मोठे होण्यापासून रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते .

Pilot केल्यामुळे तुमच्या कल्पनेचा सरळ परिणाम होणार्या लोकांची सहज प्रतिक्रिया काय असेल हे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. जर तुम्ही कामाची नवीन पद्धती सुरु करणार असाल तर कर्मचार्याची प्रतिक्रिया आणि तयारी माहित करणे गरजेचे असते . लोकांनी तुमच्या कल्पनेला तुमच्या समोर नकार नाही दिला तरी त्यांच्या कृतीतून आणि आचरणातून ते तुम्हाला खरी प्रतिक्रिया देत असतात. अशावेळी लोकांची प्रतिक्रिया लक्षात न घेत एखादी कल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला तर संसाधनाचा व्यय होऊ शकतो .

जर तुम्ही नवीन product बाजारात आणत असाल तर त्या product च्या संभावित ग्राहकांच्या समुह सोबत Pilot करणे गरजेचे आहे. हि अशीच चाचपणी योग्य रीत्य न केल्यामुळे Proctor and Gamble सारख्या बलाढ्य कंपनीला देखील नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीने प्रथमच जेव्हा Gellette भारतात लौंच केले त्या आधी pilot टेस्ट Mit मध्ये शिकत असणार्या भारतीयांवर केले. भारतात सुरुवातीला त्यांचे हे product जबरदस्त आदळले. त्यांच्या लक्षात आले कि बहुतेक भारतीय पुरुष वाटीत पाणी घेऊन दाढी करतात वाहत्या नळाचा वापर करण्याची सवय इथे नाही. त्यानंतर बरेच अनुसंधान केल्यानंतर अनेक PIilot केल्यावर Gellete पुन्हा लौंच केले गेले. पण यावेळी मात्र संभावित ग्राहकांच्या गरजा , वागणूक , सवाई अशा अनेक तथ्त्यांच्या आधारे सुधारित आणि ग्राहकोपयोगी Product त्यान्नी आणले आणि आज Razor च्या भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर आहेत.

आपल्या पैकी काहीजण म्हणतील P & G मोठ्ठी कंपनी आहे अशा[प्रकारची चाचणी ते करू शकतात पण लहान उद्योजकांचे काय . वास्तवात इच्छा असेल तर मार्ग जरूर सापडतात . टाटा न्यानो जेव्हा बाजारात आली तेव्हा आमच्या एका उद्योजक मित्राने अतिशय अभिनव कल्पना अमलात आणली. हे महाशय गाडीतील mats बनवण्याचा उद्योग करतात.

न्यानो ची किंमत एवढी कमी असल्यामुळे साहजिकच accessories देखील स्वस्त बनवाव्या लागणार होत्या पण स्वस्त माल बनवायचा म्हणजे कुठेतरी तडजोड करावी लागणार. या अशा मालामुळे retailers आणि Distributors मधे आपल्या कंपनीचे नाव खराब होण्याची त्यांना भीती होती. Pilot करणे गरजेचे होते पण Budget नाही. त्यांनी दुसर्याच नावाने माल बाजारात आणला . सहा महिने नीट निरीक्षण केले . मुद्दामहून Retailers आणि Distributors च्या प्रतिक्रिया नोंदवल्या. Product मध्ये खर्च न वाढवता अपेक्षित बदल केले. आणि मग स्वतःच्या खर्या नावाने उत्पादन बाजारात आणले . खर्च होण्याऐवजी त्यातूनही कमाइच झाली .

मित्रांनो कल्पकता आणि संयम यांची गट्टी जमवता आली तर आपण प्रत्येकजण sustainable उद्योग नक्कीच उभारू शकतो.

खाली दिलेला व्हिडियो लिंक वर क्लिक करा व तो व्हिडियो नक्की पहा.


- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 




No comments:

Post a Comment