Pages

Friday, 17 October 2014

उद्योगातील मृगजळ आणि वास्तव. - Article by कुंदन गुरव

मित्रांनो अलीकडच्या काळात सेल्फ हेल्प आणि प्रेरानादाई पुस्तकं , चर्चासत्र आणि कार्यक्रमाकडे लोकांची ओढ वाढत चालली अहे. एका अर्थाने हि खूपच सकारात्मक गोष्ट आहे. या पुस्तकांतील , कार्यक्रमातील विचार वाचून , ऐकून अनेकांना आयुष्यातील महत्वाचे निर्णय घायला आणि त्यावर कृती करण्याची प्रेरणा मिळते. Zig Ziglar साहेबांच्या मते “People often say that motivation doesn't last. Well, neither does bathing - that's why we recommend it daily.” . जीवनातील प्रेरणेचे महत्व मलाही मान्य आहे आणि अशा कार्यक्रमांची शिफारस करत असताना घ्यावयाची दक्षता आपणा समोर मांडणार आहे . 

संस्कृत मध्ये एक म्हण आहे "प्रथम ज्ञानम तत प्रयुक्ति " म्हणजे पहिला ज्ञान नंतर प्रेरणा. या गोष्टीचा अनुभव मला सध्या एका संभाषणात आला. अहमदाबादला एका इंजिनियरिंग कंपनीत आमचा strategic consulting चालते . कंपनीचे मालक एकदा मला म्हणाले " ए कुंदन भाई ए आमार रवि छे ने ए एकदमच इडीयट छे, तमे जरा येने मोटीवेट करोने" मला मनात विचार आला "if I Motivate an idiot he will be motivated idiot" . तात्पर्य प्रेरणा ज्ञानाच्या अभावात घातक ठरू शकते आणि उद्योगाच्या क्षेत्रात तर अशी प्रेरणा अतिशय त्रासदायक आणि अनेकदा आत्मघातकी ठरू शकते . आज काही live case study च्या द्वारे प्रेरणेशी निगडीत काही दक्ष्तांचा अभ्यास करूया . 

हरवून जाऊ नका . या जगात हरवून जाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. उद्योगाच्या सुरुवातील ठरवलेल्या ध्येय आणि अनेकांचं आजच स्थान यात जमीन अस्मानाचा फरक दिसतो . आपण एखाद्या चर्चासत्राला का आलो होतो, माझ्या उद्योगात यातील कोणत्या गोष्टींचा वापर करून मी उद्योगाची वाढ करू शकतो हे विसरून अनेक त्या चर्चासत्राचे प्रचारक बनतात . एखादी गोष्ट आवडली किंवा तिच्यामुळे आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडला तर त्याचा प्रचार करण्यात काही हरकत नाही पण या प्रचारक बनण्याच्या नादात माझा मूळ धंदा तर संपत नाही ना यावर कटाक्षाने लक्ष असणे गरजेचे अहे. 

मी गेल्या एका दशकात ५० पेक्षा अधिक त्या वेळच्या (दहा वर्षा आधी) नवोदित म्हणता येतील अशा उद्योजकांवर कटाक्षाने लक्ष ठेवून अहे. जेव्हा जेव्हा मी एखाद्या प्रेरणादायी कार्यक्रमाला जातो तिथे ही टाळकी सतत दिसतात. यापैकी बहुतेकांचे मूळ व्यवसाय मला माहित अहेत. त्या उद्योगक्षेत्राची क्षमता आणि त्याच कालावधीत इतरांनी सुरु केलेले त्याच क्षेत्रातील उद्योग . इतराची झालेली प्रगती आणि यांची असलेली प्रगती यामध्ये खूप मोठा फरक जनवतो. वारंवार प्रेरणादायी कार्यक्रमाला जाणार्या या उद्योजकांची प्रगती हि इतरांपेक्षा साहजिकच जास्त असली पाहिजे. पण वास्तव हे खूप वेगळं आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. फक्त काही प्रश्न विचारायचे असतात. 

सुरुवात सध्या काय करतोस पासून करावी लागते, कारण प्रत्येक तीन वर्षात याने उद्योग बदललेला असतो. अनेक वेगवेगळ्या तत्वप्रनालीच्या आहारी जाऊन स्वतःची ओळख हरवून बसलेला हा उद्योजक असतो. 

उदाहरणार्थ : don't put all eggs in one basket हे ऐकले कि अनेक उद्योजक मित्र वेग वेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी उद्योग करण्याचा प्रयत्न करतात. शब्दार्थ जरी हे सुचित करत असेल कि एका क्षेत्रात काम केलं आणि त्या क्षेत्रावर जर संकट आले तर दुसरा आधार असावा. आर्थिक गुंतवणूक करताना हि तत्वप्रणाली प्रभावी असू शकते पण उद्योग क्षेत्रात याचा फक्त शब्दार्थ समजून चालणार नाही भावार्थ समाजाने गरजेचे आहे या तत्वाप्रनालीचा प्रचार अथवा पालन करणारी लोकं अनेक बलाढ्य उद्योग समूहाचे उदाहरणे देतात अगदी रिलायंस पासून गोद्रेज पर्यंत . आणि मग असे उद्योजक उदयाला येतात ज्यांच्या ' एक न धड आणि भाराभर चिंध्या '' अशी परिस्थिती असते. या मोठ्या उद्योग समूहाचे जे बलाढ्य रूप आपणास आज दिसते ते अनेक दशकांच्या अविरत, सामुहिक आणि सातत्याने केलेल्या मेहनतीचे अभिव्यक्त रूप आहे पण सुरुवातीच्या काळात हे उद्योग हि एकाच क्षेत्रावर केंद्रित होते . जोपर्यंत एकाक्षेत्रात Sustainable revenue निर्माण होत नाही आणि तो revenue सातत्याने वाढण्य साठीची प्रणाली तुम्ही निर्माण करत नाही तो पर्यंत दुसर्या क्षेत्राकडे पाहणे हे आत्महत्ये सारखं आहे. 

अनेकदा आपण पाहतो ज्या कंपनीचे नाव XYZ Printers असते ते अचानक XYZ Enterprises किंवा XYZ Solutions होते. म्हणजे समजून घ्यावे कि आता आम्ही प्रिंटींग व्यतिरिक्त डिझायनिंग, Animation, जमलाच तर advertising अशी अनेक काम करतो. कहर म्हणजे visiting कार्डच्या मागे रिअल इस्टेट कंसालटन्ट आणि विकासक असेही छापलेलं आढळत. याला छापायला काय जातं हो घरचाच छापखाना याच्या. पण या सगळ्या Diversification च्या चक्कर मध्ये मूळ उद्योगावर दुर्लक्ष होते. हा सगळा प्रकार म्हणजे घरची बायको सोडून इतरत्र तोन्ड मारण्याचा प्रकार. ज्या मूळ उद्योगाने मला शून्यातून उभं केलं त्याच्यावर दुर्लक्ष करणे म्हणजे रक्तचे पाणी करून आपल्याला वाढवणाऱ्या आई वडलांवर दुर्लक्ष करने. आणि असले प्रकार केले कि त्याचे परिणाम हि भोगावे लागतात. दुर्दैव अस कि आता हा उद्योजक सरतेशेवटी एक agent बनून राहतो. या परिस्थिथ मला पिंजरा चित्रपट आणि त्यातील श्रीराम लागूंनी केलेली भूमिका आठवते. यावेळेचे लिखाण थोडे बोचणारे वाटत असेल, माझा रागही येत असेल पण लिखाणाचा उद्देश लक्षात घ्यावा. उद्योजक आणि उद्योजकता याबद्दलची आपुलकी आणि कळकळ फक्त प्रेरणादायी लेखनातून साध्य होणार नाहि. वेळेस कान पिळावा लागला तरी ते करणे मी माझे कर्तव्य समजतो. 

उद्योग करताना आपणासमोर अनेक तत्वप्रणाली असतात त्या तत्वप्रणाली नुसत्या ऐकून अंधश्रद्धा ठेवण्या ऐवजी त्यांचा अभ्यास तुमच्या मूळ उद्योगाच्या अनुशंघाने करावा. बाजारात वेळोवेळी अनेक संधी तुम्हाला दिसतील. या संधी 'मेणका' आणि 'रंभे' या अप्सरां प्रमाणे तुमची साधना भंग करण्याचा प्रयत्न करतील पण तुमचा विश्वामित्र होऊ देऊ नका. जो पर्यंत एका उद्योग क्षेत्रात sustainable revenue निर्माण होत नाही आणि हि sustainability टिकवून आणि वाढ करण्यासाठी लागणाऱ्या processes तुम्ही निर्माण करत नाही तो पर्यंत दुसऱ्या क्षेत्राकडे पाहू नका .

- कुंदन गुरव .........................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



No comments:

Post a Comment