बरेचशे नवीन उद्योजक बिजिनेस प्लान चे महत्व जाणतात, कारण लेखी बिजिनेस प्लान शिवाय त्यांना उद्योगासाठी भांडवल उभ करता येऊ शकत नाही. पण बरेचशे स्थापित उद्योगही बिजिनेस प्लान च्या अभावी संकटात येऊ शकतात.
मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलाच असेल या लेखात आपण उद्योगातील बी पी म्हणजेच बिजिनेस प्लान च्या महत्व बद्दल विचार विनिमय करणार आहोत. या आधीच्या लेखां मध्ये स्वतःचा शोध व उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्रण या विषयांवर विचारमंथन केले, त्यानंतर ची सहज पायरी म्हणजे उद्योगासाठी लेखी बी पी बनविणे.
आजच्या लेखात बी पी चे महत्व समजून घेऊ व पुढच्या लेखात तो कसा बनवावा याच प्रात्यक्षिक लेखी स्वरुपात पाहु.
बी पी लिहिण्या बद्दलच्या काही चुकीच्या धारणा :
• आपणास बँकेकडून अथवा Venture Funding कंपनी कडून अर्थसहाय्य हवा असेल तरच लिखित बीपी ची गरज असते
• बिपी म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तो एखादा सी ए अथवा accountant बनवतो आपण त्यांना पैसे दिले कि झालं.
• माझा बिपी माझ्या डोक्यामद्धे अगदी स्पष्ट आणि घट्ट आहे.
• प्लान करून काही घडत नसतं, आपण प्लान करतो त्याच्या विपरीतच घडतं.
• मी बिपी बनवायला असक्षम अथवा असमर्थ आहे.
• बिपी म्हणजे पन्नास पानांचा निबंध आणि तो कोणी कधीच वाचत नाही.
• Business प्लान हा एकदाच उद्योगाच्या सुरुवातीला लिहायचा असतो.
• व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हा बिपी लिहायचा असतो, चांगले मार्क्स मिळवण्याकरता.
• बिजिनेस प्लान लिहिण्याने Paralysis by Analysis होऊ शकतो.
• माझा ठाम विश्वास कृतीवर आहे व कृती करतांना मार्ग मोकळे होतात. प्लानिंग म्हणजे वेळेचा अपव्यय.
वरील चुकीच्या धरणांमध्ये आणखीन भर टाकायला म्हणून काही व्यवस्थापन प्रशिक्षकांनी अशीही बोंब उठवली आहे कि बिल गेट्स, डेल अथवा स्टीव जॉब्स या सारख्या बलाढ्य उद्योजकांकडे लिखित Business Plan नव्हता तरीही ते जगातील सर्वोत्कृष्ट उद्योजक बनू शकले.
वरील उदाहरण लोकांसमोर मांडणे म्हणजे context सोडून content मांडण्या सारखे आहे. उदाहरणातील प्रत्येक उद्योजकाने disciplined action ला यशाचे गमक मानले आहे. आता disciplined action म्हणजे काय हो. जाणून बुजून एका विशिष्ट पद्धतीने केलेली कृती. या सर्व उद्योजकांनी आपल्या विविध वक्तव्यातून प्लानिंगचे महत्व सतत लोकांसमोर मांडले आहे.
बिपी लिहिण्यात तुम्ही जो वेळ गुंतवला तो वेळ तुम्हाला भविष्यात कित्येक पटीने मोबदला मिळवून देईल. पण जर आज बिपी लिहिण्यात जर वेळ गुंतवला नाही तर त्याचे भविष्यातले परिणाम अतिशय घातक ठरू शकतात.
आज अनेक उद्योजकांना जेव्हा आम्ही विचारतो तुमच्या उद्योगाची उलाढाल येणाऱ्या तीन वर्षात किती असेल. बहुतेकांकडे याचे उत्तर नसते. काहीजण एक अंदाजे उत्तर देतात पण आणखी काही प्रश्न विचारल्यावर लक्षत येते ते फक्त intuition अथवा Intention असते. Intuition ला उद्योगात खूप महत्व आहे पण हे Intuition वास्तवात तेव्हाच येऊ शकत जेव्हा त्याला data चा आधार दिला जातो आणि हा आधार बिपी द्वारा मिळू शकतो. उद्योगपती forecasting लाही खूप महत्व आहे, त्या शिवाय मी नक्की काय कृती घ्यायची हे लक्षात येत नाही. परिणामांसाठी कृती करावी कि कृती करून परिणामांची वाट पहावी यात पहिला भाग जास्त रास्त आहे. मला काय परिणाम अपेक्षित आहेत त्या दृष्टीने कृती करण्याचा आराखडा बिपी मुळे मिळू शकतो .
Business प्लान चे काही महत्वपूर्ण फायदे :
1. तुम्ही उद्योग का करता आहात आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे याचे क्लियर चित्रण तुमच्या समोर कायम बिपी च्या रुपात असते. When why is clear how gets easier and when the promise is greater efforts does not matter.
2. बिपी लिहिताना तुमच्या मुल्यांची तुम्हाला ओळख पटते अशी मुल्य ज्यांच्यावर तुम्ही कधीही तडजोड करणार नसता हि मुल्य तुम्हाला उद्योगात अतिशय अस्थिर क्षणात टिकून राहायला मदत करतील. Its important to know what I would never do than what I would do.
3. बिपी तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या कृतीचा आराखडा प्रदान करतो ज्या मुळे तुमची शक्ती आणि क्षमता केंद्रित होऊन उद्योगाला एक विशिष्ट दिशा प्रदान करतो. You cant depend on your eyes when you are out of focus.
4. बिपी मधून तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करणारे मापदंड तुम्हाला मिळतील.
5. इंडस्ट्री बद्दलची पुरेपूर माहिती, तुमच्यासाठी संभावित संधी आणि धोक्यांची लिस्ट.
6. संभावित ग्राहक कोण आणि त्यांची व्यवहार करण्याची सध्याची पद्धत काय आहे याचे ज्ञान मिळते .7. उद्योगातील स्पर्धकांची माहिती व त्यांना तोंड देण्यासातीचा आराखडा तयार असतो.
8. उद्योगातील ध्येय व लक्ष्य साध्य करण्याचे वेळापत्रक बनते.
9. तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे सविस्तर वर्णन उपलबद्ध होते.
10. उत्पादनाच्या बाजारीकारणाचा आराखडा तयार होतो.
11. उद्योगाची उलाढाल व त्या अनुषंगाने होणारा खर्च आणि नफा याचा अंदाज मांडता येतो.
12. तुमचा कृतीचा आराखडा जो तुम्हाला संभावित आड्मार्ग आणि धोके यांची माहिती पुरवून सुजाग ठेवतो.
13. कधी कशाप्रकारची Manpower लागेल याची माहिती प्राप्त होते.
14. उद्योगाचा एक ओळखपत्र तयार होते ते अनेक ठिकाणी वापरता येते.
बिपी लिहिण्याबाद्दाचे अनेक Format आणि पद्धती इंटरनेट वर उपलबद्ध आहेत. तुमचा बिपी त्याच Form मध्ये बसेल अथवा असावा असा काही नियम नाही. या उपलबद्ध पद्धतीचा उपयोग फक्त रेफेरंस म्हणून करावा.
धन्यवाद …
by कुंदन गुरव ..........................
या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.
- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546
No comments:
Post a Comment