Pages

Wednesday, 19 November 2014

आकडेमोड आणि तुमचा उद्योग. - Article by कुंदन गुरव

एका उद्योजक मित्राला मी सहज प्रश्न विचारला "तुझ्या उद्योगाचा turnover किती?" लगेच उत्तर आले ५० लाख . त्या पुढचा माझा प्रश्न होता Gross Profit कीती? तो थोडासा गोंधळला . थोडा विचार करून त्याने एक संख्या सांगितली . मला ती खारी वाटली नाही म्हणून मी त्याला विचारले अच्छा Pbt (profit before Tax ) कीती? आणि PAT (Profit after tax ) किति? तो अजूनच गोंधळला . मग आणखी मोठ्ठा प्रश्न EBIDTA (Earnings Before Interest , depreciation , Tax and amortization कीती? आत्ता मात्र त्याची तारांबळ पाहण्यासारखी होति. हे प्रश्न त्याची मजा घेण्यासाठी नव्हते पण त्याला खरोखर मदत करण्याच्या इच्छेने विचारले होते. हा लेख पुढे वाचण्या आधी तुम्ही हि हे प्रश्न स्वतःला विचारा. उडूद्या थोडा गोंधळ उडला तर . 

Balance Sheet पाहताय का?, नका पाहू त्यात खरी उत्तरं मिळणार नाहीत . आपण सर्वांना आपल्या Balance Sheet ची सत्यता माहित आहे . 

Balance sheet हि CA ने बनवण्याचा दस्तऐवज आहे. income tax department ला दाखवावा लागतो म्हणून आम्ही ते बनवतो. CA ला एकदा brief दिली कि तो बघून घेईल काय कराचे ते . माझ तर डोकच फिरत accounting म्हंटला कि अशी अनेक वाक्य आपण उद्योजकांच्या तोंडी नेहमी ऐकतो . आज या लेखात आपण आकड्यांच आपल्या उद्योगाच्या वाढीतला संबंध पाहू आणि कोणते महत्वाचे आकडे आपण स्वतः Monitor करणे आवश्यक आहे ते पाहूया. 

आपण उद्योजक सारेच स्वप्नवेडे असतो . कुणी भरपूर पैसे कमवायचे स्वप्न पाहतो तर कुणी उत्तम product बनवून स्वतःची खास ओळख निर्माण करण्याच्या ध्येयाने पेटलेला असतो . कुणाला स्वतःच्या कार्याने अखंड समाज बदलायचा असतो तर कुणी इतरांना रोजगार कसा मिळेल यासाठी धडपडत असतो. उद्योगाचा उद्देश जरी सरळ समाजसेवी दिसत नसला आणि तो स्वार्थी दिसत असला तरी प्रत्येक यशस्वी उद्योग समाजातील अनेक घटकांवर प्रभाव टाकत असातो. जेव्हा जेव्हा मोट्ठे अवार्ड फंक्शन होतात त्या वर केला जाणारा खर्च पाहून माझे वडील नेहमी वैतागतात. त्यांच्या दृष्टीने हा पैशाचा व्यय अहे. आता असे कार्यक्रम व्हावेत किंवा होऊ नयेत याही पेक्षा या कार्याक्रमा मुळे किती लोकांना रोजगार मिळाला याचाच विचार माझ्या मनात असतो. आता हि तुमची स्वप्न पूर्ण करत असताना अनेकांची स्वप्न अथवा गरजा जर पूर्ण होणार असतील तर त्याच व्यवस्थापन उत्तम रित्या होण खूप गरजेच आहे . 

उद्योगाच्या व्यवस्थापनात आर्थिक व्यवस्थापनाला सर्वात अधिक महत्व देणे हरजेचे आहे. 

मी स्वतः अशा अनेक उद्योजकांना भेटलो आहे ज्यांचा उद्योग प्रथमदर्शी पाहता उत्तम वाटतो . त्या उद्योजकाला वाटत असते आम्ही नफा करतो आहे पण शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी केल्यावर लक्षात येते कि वास्ताविक पाहता गेली तीन वर्ष उद्योगात नुकसान होते आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईतील एक अतिशय नावाजलेली real estate कंपनी. अनेक project parelally करणारी. वर्षाखेरीस उद्योगात तसा पहिला तर नफा दिसत होता पण जेव्हा त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने एका एका प्रोजेक्ट चे आर्थिक विश्लेषण केले तेव्हा लक्षात आले कि त्यांचा एक महात्वात्च्या प्रोजेक्ट मध्ये सगळे गाळे विकल्यानंतर त्यांना फक्त शेवटचा गाळा विकल्यावर त्या एका गाळ्याची जी किंमत मिळेल तोच त्यांचा नफा. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या कंपनीला हे लक्षात कसे आले नहि. याच गूढ लपले आहे तुम्ही Net Profit कसे calculate करता यावर. 

आणखी एक उद्योजक मित्र imitation jewelry बनविण्याच उद्योग करतात. त्यांना. अनेक वर्ष उद्योग करूनही आपण नक्की किती टक्के नफा कमावतोय हे छातीठोक पाने सांगता येत नहि. धंदा और जिंदगी मस्त चल राही ही हे त्यांचे उत्तर. एकदा मी त्यांना विचारले " आप धंदे के लिये ये जो ७ गाले वापर राहे हो इंनका रेंट कितना दे ते हो ?" उत्तर आले " अरे भाडा कीस बात का ये तो अपनी हि जगह है . मी विचारल "अगर भाडा देणा पडता तो?" थोडा वेळ ते गप्पा बसले आणि लख्ख प्रकाश पडल्या सारखे म्हणाले . " धंदे की बुनियाद हि हिल जायेगी, अगर मी फ्याक्टरी कही और लोकेशन ले जाऊ तो इस जगह से अने वाला भडा मेरे profit इतनाही होगा . मतलब मी इस धन्देमे जोखीम लेकर अपने आप को सिर्फ व्यस्त रख रहा हु और खुश हो राहा हु कि मै Business कर राहा हु ". या संभाषणा नंतर आम्ही त्याचं संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन केलं. आज त्यांची फ्याक्टरी मुंबईत नसून वाड्याला अहे. office industrial गाळ्यातून commercial complex मध्ये आहे . उलाढाल वाढली आणि नक्की किती टक्के निव्वळ नफा होतो हे हि त्यांना माहित अहे. हे सर्व उद्योगातील काही महत्वाचे आकडे नियमित Monitor केल्याने शक्य झाले. 

अर्थक्षेत्रातील तज्ञ काय सुचवतात त्या हि पेक्षा उद्योजक म्हणून मला वाटते प्रत्येक उद्योजकाकडे स्वतःचे Management Account असणे महत्वाचे 

उदाहरण : Revenu ( उलाढाल) - वजा Direct Cost (उत्पादनासाठी लागणारा खर्च ) = Gross Profit ढोबळ नफा 

Revenue किंवा Top line म्हणजे एका ठराविक कालावधीत मिळवलेले पैसे ज्यात कंपनीने दिलेली सुठ व returned Goods च्या किमतीचा हि समावेश असतो वजा Direct Cost म्हणजे उत्पादना साठी लागणारे कच्चा माल , मनुष्य बळ , विक्री खर्च (sales cost Not marketing )आणि असे खर्च जे फक्त त्या उत्पदाच्या उत्पादनाशी निगडीत आहेत. =

Gross Profit ढोबळ नफा हि एक अशी संख्या आहे ज्यातून अजून फक्त उत्पादनासाठी आणि उत्पाद विकण्यासाठीचा खर्च वजा केला आहे . हे साधे गणित करत असतांना उद्योजकाला उत्पादनासाठी लागणाऱ्या एकंदरीत खर्च समजतो . यातील कोणता खर्च कमी अथवा टाळता येऊ शकतो यावर लक्ष केंद्रित होते. मी जेव्हा सुरुवातीला उत्पाद बनवले त्यावेळेला काही assumptions गृहिते मांडली होती ती गृहिते अजूनही तशीच आहेत कि त्यात बदल झाला आहे ? जर त्यात बदल झाला आहे तर माझी Production Cost वाढली आहे का ? याचा माझ्या प्रोदुक्ट्च्या किंमतीवर काय परिणाम होईल ? जर मी किंमत वाढवली तर माझा ग्राहक वर्ग त्याला स्वीकारेल का ? मला माझ्या विक्रीच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्योजक या छोट्याश्या analysis ने मिळवू शकतात. 

एकदा तुमचा Gross Profit लक्षात आला कि मग त्यातून Indirect Cost वजा केली कि तुम्हाला Pbt म्हणजेच Profit Before Tax मिळेल. Indirect cost म्हणजे, असा खर्च जो एखाद्या product किंवा प्रोजेक्टला assign नेमता येत नाही . उदाहरणार्थ तुमच्या कारखान्याचे भाडे , administration (प्रशासन ) खर्च , Security (सुरक्षा ) खर्च. हे खर्च ठराविक (fixed ) अथवा Variable असू शकतात. एकदा Pbt लक्षात आला कि मग त्यातून इंटरेस्ट, Depreciation , Tax , आणि amortization वजा केले कि तुमचा Net Profit तुम्हाला मिळतो. 

आता यातील इंटरेस्ट आणि ट्याक्स calculate करणे तसे सोपे आहे पण Depreciation आणि amortization समजून घेणे गरजेचे आहे. हे दोन्ही खर्च बहुदा कॅपिटल investments किंवा अशा खर्चांसाठी असतात ज्याचा उपयोग हा एका पेक्षा अधिक आर्थिक वर्षात होणार असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर कारखाना बनवला तर त्याचा खर्च एका वर्षात कमावणे शक्य नसते आणि कारखान्याची उपयोगिता हि अनेक वर्षाची अस्ते. त्याच प्रमाणे जर तुम्ही एखादे मार्केटिंग क्याम्पेन केले असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला अनेक वर्ष मिळणार असतात. अशावेळेला हा खर्च एकवार्षाच्या जमाखर्चात धरल्यास न्याय्य तारणार नाही , म्हणून हा खर्च विशिष्ट वर्षांमध्ये समान अथवा वेगवेगळ्या प्रमाणात वाटला जातो. 

जेव्हा एखाद्या प्रकट Tangible ( यंत्र, कारखाना) अशा मालमत्तेचा खर्च विभागला जातो त्याला depreciation म्हणतात आणि जेव्हा intangible अप्रकट (मार्केटिंग, advertising , Branding, Intellectual property ) यांचे amortization केले जाते .

मित्रांनो थोडासा management Accounting चा अभ्यास केल्यास आपणही आपल्या उद्योगातील अनेक खाचखळगे उळाखू शकतो , वेळच्या वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि उद्योगाची sustainable वाढ करू शकतो . 

- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 


Monday, 10 November 2014

उद्योगात नवीन कल्पनांचे संगोपण आणि अंबलबजावणी कशी कराल? - Article by कुंदन गुरव

उद्योग सुरु केल्यावर त्याला यशस्वी करण्यासाठी उद्योजक नेहमी नवनवीन कल्पनांच्या शोधत असतात . या नवीन कल्पना कधी product /services च्या रूपाने तर कधी काम करण्याच्या पद्धतीच्या रूपाने अस्तित्वात येत असतात. या नवीन कल्पना कधी उद्योजकाच्या अंतःप्रेरणेतून (Intuition) मधून निर्माण होतात तर कधी industry trends मधून उदभवतात. रोज वर्तमान पत्रे , ntworking , industry reports अशा अनेक माध्यमातील माहितीच्या आधारे या नवीन कल्पना उद्योजकाच्या मनात निर्माण होत असतात. प्रत्येक नवीन कल्पनेच्या मागे उद्योग विकासाची संधी उद्योजकाला दिसत असते आणि म्हणूनच तो प्रत्येक नवीन कल्पनेबद्दल अतिशय प्रेरित असतो . बाब अगदी खरी आहे कि "an idea can change your life" एक कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते पण त्या कल्पनेचं व्यवस्तीत संगोपन आणि अंबलबजावणी नाही झाली तर करोडोंची कल्पना काडीमोल हि ठरू शकते. याही पुढे जाऊन मी म्हणेन तुमच्या कल्पनेचा फायदा तुम्हाला न होता दुसराच त्याची फळे उपभोगेल . "Steal Ideas shamelessly" अशी एक म्हण उद्योग जगात प्रचलित आहे . म्हणूनच आजच्या लेखात नवीन कल्पनांचे संगोपण आणि व्यवस्थित अंबलबजावणी कशी करावी यावर माझे विचार मांडणार आहे . 
पुढील गोष्टी टाळ

Hazard Blindness

“He’s as blind as he can be, just sees what he wants to see” John Lennon या सुप्रसिध्द पाश्च्यात गायकाने त्याच्या एका गाण्यात हे वाक्य म्हंटल अहे. Hazard Blindness हा आजार बहुतेक उद्योजकांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतोच. जेव्हा जेव्हा नवीन संधी दिसते तेव्हा तेव्हा हा आजार उफाळून येतो. समोर दिसणाऱ्या संधीत उद्योजक फक्त त्याला पहाव्याशा वाटणार्या गोष्टीच पहतो. संधीच्या भव्यते मद्धे आणि त्यातून होणार्या फायद्याच्या गणितात तो एवढा रंगून जातो कि संधीबरोबर येणाऱ्या जोखामिकडे जवळ जवळ दुर्लक्ष्य करतो. छोट्या छोट्या वाटणाऱ्या प्रतिकूल गोष्टी नवीन कल्पनेच्या अंमलबजावणीत मोठ्या अडचणी म्हणून उभ्या राहतात आणि मग त्या नवीन कल्पनेतून अपेक्षित परिणाम साधता येत नहित. या अपयशाचा जसा प्रतिकूल पारणं उद्योजाकावर होतो तसाच याचा परिणाम सघटनेत काम करणाऱ्या कामांच्यावर देखील होतो. असे प्रकार वारंवार होऊ लागले कि साहजिकच कर्मचाऱ्यांचा नवीन काही करण्याचा उत्साह संपून जातो आणि याचे परिणाम उद्योजकाला पर्यायाने उद्योगाला भोगावे लागतात .

knee jerk action. विचारहीन कृती

एखाद्या source मधून एखादी उद्योग उपयुक्त माहिती मिळाली कि उद्योजकाचे त्या अनुशंघाने विचार चक्र सुरु होते आणि या विचार चक्रातून नवीन कल्पना निर्माण होतात . वास्तविक पाहता अशा प्रकारे नवीन कल्पना निर्माण करणे हे उद्योजकासाठी अतिशय महत्वाचे आहे पण या कल्पनांचा मेदूत उगम झाल्यानंतर त्यावर काम कशा पद्धतीने होते हे त्या कल्पनेच्या यशस्वी अथवा अपयशी होणे ठरवते . माझे mentor आणि Meru cab कंपनीचे संचालक नीरज गुप्ता नेहमी म्हणतात "implementation is as important rather far important than idealization " सकाळी वर्तमानपत्रात अथवा tv वरची एखादी बातमी ऐकून उद्योजक ऑफिसला पोह्चला कि लगेच घोषणा करून टाकतो आज पासून आपण हि नवीन गोष्ट अमलात आणणार आहोत. कोणाचाही विचार सहभागी न करता केलेली हि घोषणा सगळ्यांनाच पटते असे नाही साहजिकच हा असा अचानक मिळालेल्या धक्क्याला कोणीही तयार नसते आणि मग अंमलबजावणीत अनेक त्रुटी आढळतात. चांगली कल्पना अपयशी ठरते .

कोणतीही नवीन कल्पना अपेक्षित रित्या अम्बालाबाजावणी करून यशस्वी करायची असेल तर ती नियोजान्बाध्ध पद्धतीने साकारली पाहिजे. नवीन कल्पना मग ती नवीन Product / Project / Service अथवा काम करण्याची पद्धत या पैकी कोणतीही असो pilot पद्धतीने केल्यास त्याची अपेक्षित आणि परिणामकारक निष्पत्ती प्राप्त होते .

Piloting

Piloting चा सरळ सोपा अर्थ आहे चाचणी अथवा एखाद्या मोठ्या कार्याचे छोटे रूप. परीक्षणासाठी केलेली कृती . अशा प्रकारची चाचणी साठी केलेली कृती संभावित अडथळे ओळखण्यास , अडथळ्यांना वेळीच दुर करण्या साठी आणि छोटे अडथळे मोठे होण्यापासून रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते .

Pilot केल्यामुळे तुमच्या कल्पनेचा सरळ परिणाम होणार्या लोकांची सहज प्रतिक्रिया काय असेल हे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. जर तुम्ही कामाची नवीन पद्धती सुरु करणार असाल तर कर्मचार्याची प्रतिक्रिया आणि तयारी माहित करणे गरजेचे असते . लोकांनी तुमच्या कल्पनेला तुमच्या समोर नकार नाही दिला तरी त्यांच्या कृतीतून आणि आचरणातून ते तुम्हाला खरी प्रतिक्रिया देत असतात. अशावेळी लोकांची प्रतिक्रिया लक्षात न घेत एखादी कल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला तर संसाधनाचा व्यय होऊ शकतो .

जर तुम्ही नवीन product बाजारात आणत असाल तर त्या product च्या संभावित ग्राहकांच्या समुह सोबत Pilot करणे गरजेचे आहे. हि अशीच चाचपणी योग्य रीत्य न केल्यामुळे Proctor and Gamble सारख्या बलाढ्य कंपनीला देखील नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीने प्रथमच जेव्हा Gellette भारतात लौंच केले त्या आधी pilot टेस्ट Mit मध्ये शिकत असणार्या भारतीयांवर केले. भारतात सुरुवातीला त्यांचे हे product जबरदस्त आदळले. त्यांच्या लक्षात आले कि बहुतेक भारतीय पुरुष वाटीत पाणी घेऊन दाढी करतात वाहत्या नळाचा वापर करण्याची सवय इथे नाही. त्यानंतर बरेच अनुसंधान केल्यानंतर अनेक PIilot केल्यावर Gellete पुन्हा लौंच केले गेले. पण यावेळी मात्र संभावित ग्राहकांच्या गरजा , वागणूक , सवाई अशा अनेक तथ्त्यांच्या आधारे सुधारित आणि ग्राहकोपयोगी Product त्यान्नी आणले आणि आज Razor च्या भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर आहेत.

आपल्या पैकी काहीजण म्हणतील P & G मोठ्ठी कंपनी आहे अशा[प्रकारची चाचणी ते करू शकतात पण लहान उद्योजकांचे काय . वास्तवात इच्छा असेल तर मार्ग जरूर सापडतात . टाटा न्यानो जेव्हा बाजारात आली तेव्हा आमच्या एका उद्योजक मित्राने अतिशय अभिनव कल्पना अमलात आणली. हे महाशय गाडीतील mats बनवण्याचा उद्योग करतात.

न्यानो ची किंमत एवढी कमी असल्यामुळे साहजिकच accessories देखील स्वस्त बनवाव्या लागणार होत्या पण स्वस्त माल बनवायचा म्हणजे कुठेतरी तडजोड करावी लागणार. या अशा मालामुळे retailers आणि Distributors मधे आपल्या कंपनीचे नाव खराब होण्याची त्यांना भीती होती. Pilot करणे गरजेचे होते पण Budget नाही. त्यांनी दुसर्याच नावाने माल बाजारात आणला . सहा महिने नीट निरीक्षण केले . मुद्दामहून Retailers आणि Distributors च्या प्रतिक्रिया नोंदवल्या. Product मध्ये खर्च न वाढवता अपेक्षित बदल केले. आणि मग स्वतःच्या खर्या नावाने उत्पादन बाजारात आणले . खर्च होण्याऐवजी त्यातूनही कमाइच झाली .

मित्रांनो कल्पकता आणि संयम यांची गट्टी जमवता आली तर आपण प्रत्येकजण sustainable उद्योग नक्कीच उभारू शकतो.

खाली दिलेला व्हिडियो लिंक वर क्लिक करा व तो व्हिडियो नक्की पहा.


- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 




Friday, 17 October 2014

उद्योगातील मृगजळ आणि वास्तव. - Article by कुंदन गुरव

मित्रांनो अलीकडच्या काळात सेल्फ हेल्प आणि प्रेरानादाई पुस्तकं , चर्चासत्र आणि कार्यक्रमाकडे लोकांची ओढ वाढत चालली अहे. एका अर्थाने हि खूपच सकारात्मक गोष्ट आहे. या पुस्तकांतील , कार्यक्रमातील विचार वाचून , ऐकून अनेकांना आयुष्यातील महत्वाचे निर्णय घायला आणि त्यावर कृती करण्याची प्रेरणा मिळते. Zig Ziglar साहेबांच्या मते “People often say that motivation doesn't last. Well, neither does bathing - that's why we recommend it daily.” . जीवनातील प्रेरणेचे महत्व मलाही मान्य आहे आणि अशा कार्यक्रमांची शिफारस करत असताना घ्यावयाची दक्षता आपणा समोर मांडणार आहे . 

संस्कृत मध्ये एक म्हण आहे "प्रथम ज्ञानम तत प्रयुक्ति " म्हणजे पहिला ज्ञान नंतर प्रेरणा. या गोष्टीचा अनुभव मला सध्या एका संभाषणात आला. अहमदाबादला एका इंजिनियरिंग कंपनीत आमचा strategic consulting चालते . कंपनीचे मालक एकदा मला म्हणाले " ए कुंदन भाई ए आमार रवि छे ने ए एकदमच इडीयट छे, तमे जरा येने मोटीवेट करोने" मला मनात विचार आला "if I Motivate an idiot he will be motivated idiot" . तात्पर्य प्रेरणा ज्ञानाच्या अभावात घातक ठरू शकते आणि उद्योगाच्या क्षेत्रात तर अशी प्रेरणा अतिशय त्रासदायक आणि अनेकदा आत्मघातकी ठरू शकते . आज काही live case study च्या द्वारे प्रेरणेशी निगडीत काही दक्ष्तांचा अभ्यास करूया . 

हरवून जाऊ नका . या जगात हरवून जाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. उद्योगाच्या सुरुवातील ठरवलेल्या ध्येय आणि अनेकांचं आजच स्थान यात जमीन अस्मानाचा फरक दिसतो . आपण एखाद्या चर्चासत्राला का आलो होतो, माझ्या उद्योगात यातील कोणत्या गोष्टींचा वापर करून मी उद्योगाची वाढ करू शकतो हे विसरून अनेक त्या चर्चासत्राचे प्रचारक बनतात . एखादी गोष्ट आवडली किंवा तिच्यामुळे आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडला तर त्याचा प्रचार करण्यात काही हरकत नाही पण या प्रचारक बनण्याच्या नादात माझा मूळ धंदा तर संपत नाही ना यावर कटाक्षाने लक्ष असणे गरजेचे अहे. 

मी गेल्या एका दशकात ५० पेक्षा अधिक त्या वेळच्या (दहा वर्षा आधी) नवोदित म्हणता येतील अशा उद्योजकांवर कटाक्षाने लक्ष ठेवून अहे. जेव्हा जेव्हा मी एखाद्या प्रेरणादायी कार्यक्रमाला जातो तिथे ही टाळकी सतत दिसतात. यापैकी बहुतेकांचे मूळ व्यवसाय मला माहित अहेत. त्या उद्योगक्षेत्राची क्षमता आणि त्याच कालावधीत इतरांनी सुरु केलेले त्याच क्षेत्रातील उद्योग . इतराची झालेली प्रगती आणि यांची असलेली प्रगती यामध्ये खूप मोठा फरक जनवतो. वारंवार प्रेरणादायी कार्यक्रमाला जाणार्या या उद्योजकांची प्रगती हि इतरांपेक्षा साहजिकच जास्त असली पाहिजे. पण वास्तव हे खूप वेगळं आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. फक्त काही प्रश्न विचारायचे असतात. 

सुरुवात सध्या काय करतोस पासून करावी लागते, कारण प्रत्येक तीन वर्षात याने उद्योग बदललेला असतो. अनेक वेगवेगळ्या तत्वप्रनालीच्या आहारी जाऊन स्वतःची ओळख हरवून बसलेला हा उद्योजक असतो. 

उदाहरणार्थ : don't put all eggs in one basket हे ऐकले कि अनेक उद्योजक मित्र वेग वेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी उद्योग करण्याचा प्रयत्न करतात. शब्दार्थ जरी हे सुचित करत असेल कि एका क्षेत्रात काम केलं आणि त्या क्षेत्रावर जर संकट आले तर दुसरा आधार असावा. आर्थिक गुंतवणूक करताना हि तत्वप्रणाली प्रभावी असू शकते पण उद्योग क्षेत्रात याचा फक्त शब्दार्थ समजून चालणार नाही भावार्थ समाजाने गरजेचे आहे या तत्वाप्रनालीचा प्रचार अथवा पालन करणारी लोकं अनेक बलाढ्य उद्योग समूहाचे उदाहरणे देतात अगदी रिलायंस पासून गोद्रेज पर्यंत . आणि मग असे उद्योजक उदयाला येतात ज्यांच्या ' एक न धड आणि भाराभर चिंध्या '' अशी परिस्थिती असते. या मोठ्या उद्योग समूहाचे जे बलाढ्य रूप आपणास आज दिसते ते अनेक दशकांच्या अविरत, सामुहिक आणि सातत्याने केलेल्या मेहनतीचे अभिव्यक्त रूप आहे पण सुरुवातीच्या काळात हे उद्योग हि एकाच क्षेत्रावर केंद्रित होते . जोपर्यंत एकाक्षेत्रात Sustainable revenue निर्माण होत नाही आणि तो revenue सातत्याने वाढण्य साठीची प्रणाली तुम्ही निर्माण करत नाही तो पर्यंत दुसर्या क्षेत्राकडे पाहणे हे आत्महत्ये सारखं आहे. 

अनेकदा आपण पाहतो ज्या कंपनीचे नाव XYZ Printers असते ते अचानक XYZ Enterprises किंवा XYZ Solutions होते. म्हणजे समजून घ्यावे कि आता आम्ही प्रिंटींग व्यतिरिक्त डिझायनिंग, Animation, जमलाच तर advertising अशी अनेक काम करतो. कहर म्हणजे visiting कार्डच्या मागे रिअल इस्टेट कंसालटन्ट आणि विकासक असेही छापलेलं आढळत. याला छापायला काय जातं हो घरचाच छापखाना याच्या. पण या सगळ्या Diversification च्या चक्कर मध्ये मूळ उद्योगावर दुर्लक्ष होते. हा सगळा प्रकार म्हणजे घरची बायको सोडून इतरत्र तोन्ड मारण्याचा प्रकार. ज्या मूळ उद्योगाने मला शून्यातून उभं केलं त्याच्यावर दुर्लक्ष करणे म्हणजे रक्तचे पाणी करून आपल्याला वाढवणाऱ्या आई वडलांवर दुर्लक्ष करने. आणि असले प्रकार केले कि त्याचे परिणाम हि भोगावे लागतात. दुर्दैव अस कि आता हा उद्योजक सरतेशेवटी एक agent बनून राहतो. या परिस्थिथ मला पिंजरा चित्रपट आणि त्यातील श्रीराम लागूंनी केलेली भूमिका आठवते. यावेळेचे लिखाण थोडे बोचणारे वाटत असेल, माझा रागही येत असेल पण लिखाणाचा उद्देश लक्षात घ्यावा. उद्योजक आणि उद्योजकता याबद्दलची आपुलकी आणि कळकळ फक्त प्रेरणादायी लेखनातून साध्य होणार नाहि. वेळेस कान पिळावा लागला तरी ते करणे मी माझे कर्तव्य समजतो. 

उद्योग करताना आपणासमोर अनेक तत्वप्रणाली असतात त्या तत्वप्रणाली नुसत्या ऐकून अंधश्रद्धा ठेवण्या ऐवजी त्यांचा अभ्यास तुमच्या मूळ उद्योगाच्या अनुशंघाने करावा. बाजारात वेळोवेळी अनेक संधी तुम्हाला दिसतील. या संधी 'मेणका' आणि 'रंभे' या अप्सरां प्रमाणे तुमची साधना भंग करण्याचा प्रयत्न करतील पण तुमचा विश्वामित्र होऊ देऊ नका. जो पर्यंत एका उद्योग क्षेत्रात sustainable revenue निर्माण होत नाही आणि हि sustainability टिकवून आणि वाढ करण्यासाठी लागणाऱ्या processes तुम्ही निर्माण करत नाही तो पर्यंत दुसऱ्या क्षेत्राकडे पाहू नका .

- कुंदन गुरव .........................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



उद्योगातला बी.पी. (बिजिनेस प्लान) ... Article by कुंदन गुरव

बरेचशे नवीन उद्योजक बिजिनेस प्लान चे महत्व जाणतात, कारण लेखी बिजिनेस प्लान शिवाय त्यांना उद्योगासाठी भांडवल उभ करता येऊ शकत नाही. पण बरेचशे स्थापित उद्योगही बिजिनेस प्लान च्या अभावी संकटात येऊ शकतात.

मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलाच असेल या लेखात आपण उद्योगातील बी पी म्हणजेच बिजिनेस प्लान च्या महत्व बद्दल विचार विनिमय करणार आहोत. या आधीच्या लेखां मध्ये स्वतःचा शोध व उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्रण या विषयांवर विचारमंथन केले, त्यानंतर ची सहज पायरी म्हणजे उद्योगासाठी लेखी बी पी बनविणे.

आजच्या लेखात बी पी चे महत्व समजून घेऊ व पुढच्या लेखात तो कसा बनवावा याच प्रात्यक्षिक लेखी स्वरुपात पाहु.

बी पी लिहिण्या बद्दलच्या काही चुकीच्या धारणा :

• आपणास बँकेकडून अथवा Venture Funding कंपनी कडून अर्थसहाय्य हवा असेल तरच लिखित बीपी ची गरज असते

• बिपी म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तो एखादा सी ए अथवा accountant बनवतो आपण त्यांना पैसे दिले कि झालं.

• माझा बिपी माझ्या डोक्यामद्धे अगदी स्पष्ट आणि घट्ट आहे.

• प्लान करून काही घडत नसतं, आपण प्लान करतो त्याच्या विपरीतच घडतं.

• मी बिपी बनवायला असक्षम अथवा असमर्थ आहे.

• बिपी म्हणजे पन्नास पानांचा निबंध आणि तो कोणी कधीच वाचत नाही.

• Business प्लान हा एकदाच उद्योगाच्या सुरुवातीला लिहायचा असतो.

• व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हा बिपी लिहायचा असतो, चांगले मार्क्स मिळवण्याकरता.

• बिजिनेस प्लान लिहिण्याने Paralysis by Analysis होऊ शकतो.

• माझा ठाम विश्वास कृतीवर आहे व कृती करतांना मार्ग मोकळे होतात. प्लानिंग म्हणजे वेळेचा अपव्यय.

वरील चुकीच्या धरणांमध्ये आणखीन भर टाकायला म्हणून काही व्यवस्थापन प्रशिक्षकांनी अशीही बोंब उठवली आहे कि बिल गेट्स, डेल अथवा स्टीव जॉब्स या सारख्या बलाढ्य उद्योजकांकडे लिखित Business Plan नव्हता तरीही ते जगातील सर्वोत्कृष्ट उद्योजक बनू शकले.

वरील उदाहरण लोकांसमोर मांडणे म्हणजे context सोडून content मांडण्या सारखे आहे. उदाहरणातील प्रत्येक उद्योजकाने disciplined action ला यशाचे गमक मानले आहे. आता disciplined action म्हणजे काय हो. जाणून बुजून एका विशिष्ट पद्धतीने केलेली कृती. या सर्व उद्योजकांनी आपल्या विविध वक्तव्यातून प्लानिंगचे महत्व सतत लोकांसमोर मांडले आहे.

बिपी लिहिण्यात तुम्ही जो वेळ गुंतवला तो वेळ तुम्हाला भविष्यात कित्येक पटीने मोबदला मिळवून देईल. पण जर आज बिपी लिहिण्यात जर वेळ गुंतवला नाही तर त्याचे भविष्यातले परिणाम अतिशय घातक ठरू शकतात.

आज अनेक उद्योजकांना जेव्हा आम्ही विचारतो तुमच्या उद्योगाची उलाढाल येणाऱ्या तीन वर्षात किती असेल. बहुतेकांकडे याचे उत्तर नसते. काहीजण एक अंदाजे उत्तर देतात पण आणखी काही प्रश्न विचारल्यावर लक्षत येते ते फक्त intuition अथवा Intention असते. Intuition ला उद्योगात खूप महत्व आहे पण हे Intuition वास्तवात तेव्हाच येऊ शकत जेव्हा त्याला data चा आधार दिला जातो आणि हा आधार बिपी द्वारा मिळू शकतो. उद्योगपती forecasting लाही खूप महत्व आहे, त्या शिवाय मी नक्की काय कृती घ्यायची हे लक्षात येत नाही. परिणामांसाठी कृती करावी कि कृती करून परिणामांची वाट पहावी यात पहिला भाग जास्त रास्त आहे. मला काय परिणाम अपेक्षित आहेत त्या दृष्टीने कृती करण्याचा आराखडा बिपी मुळे मिळू शकतो .

Business प्लान चे काही महत्वपूर्ण फायदे :

1. तुम्ही उद्योग का करता आहात आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे याचे क्लियर चित्रण तुमच्या समोर कायम बिपी च्या रुपात असते. When why is clear how gets easier and when the promise is greater efforts does not matter.

2. बिपी लिहिताना तुमच्या मुल्यांची तुम्हाला ओळख पटते अशी मुल्य ज्यांच्यावर तुम्ही कधीही तडजोड करणार नसता हि मुल्य तुम्हाला उद्योगात अतिशय अस्थिर क्षणात टिकून राहायला मदत करतील. Its important to know what I would never do than what I would do.

3. बिपी तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या कृतीचा आराखडा प्रदान करतो ज्या मुळे तुमची शक्ती आणि क्षमता केंद्रित होऊन उद्योगाला एक विशिष्ट दिशा प्रदान करतो. You cant depend on your eyes when you are out of focus.

4. बिपी मधून तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करणारे मापदंड तुम्हाला मिळतील.

5. इंडस्ट्री बद्दलची पुरेपूर माहिती, तुमच्यासाठी संभावित संधी आणि धोक्यांची लिस्ट.

6. संभावित ग्राहक कोण आणि त्यांची व्यवहार करण्याची सध्याची पद्धत काय आहे याचे ज्ञान मिळते .7. उद्योगातील स्पर्धकांची माहिती व त्यांना तोंड देण्यासातीचा आराखडा तयार असतो.

8. उद्योगातील ध्येय व लक्ष्य साध्य करण्याचे वेळापत्रक बनते.

9. तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे सविस्तर वर्णन उपलबद्ध होते.

10. उत्पादनाच्या बाजारीकारणाचा आराखडा तयार होतो.

11. उद्योगाची उलाढाल व त्या अनुषंगाने होणारा खर्च आणि नफा याचा अंदाज मांडता येतो.

12. तुमचा कृतीचा आराखडा जो तुम्हाला संभावित आड्मार्ग आणि धोके यांची माहिती पुरवून सुजाग ठेवतो.

13. कधी कशाप्रकारची Manpower लागेल याची माहिती प्राप्त होते.

14. उद्योगाचा एक ओळखपत्र तयार होते ते अनेक ठिकाणी वापरता येते.


बिपी लिहिण्याबाद्दाचे अनेक Format आणि पद्धती इंटरनेट वर उपलबद्ध आहेत. तुमचा बिपी त्याच Form मध्ये बसेल अथवा असावा असा काही नियम नाही. या उपलबद्ध पद्धतीचा उपयोग फक्त रेफेरंस म्हणून करावा.

धन्यवाद …

by कुंदन गुरव ..........................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



उद्योजक मित्रांनो, Define your play Ground. तुमची खेळपट्टी निश्चित करा. - Article by कुंदन गुरव

नमस्कार, उद्योजक मित्रांनो …

आत्तापर्यंतच्या लेखांद्वारे आपण उद्योग सुरु करण्या आधी किंवा उद्योगाच्या sustainability करिता वैचरिक शुधीकार्ना विषयी वाचलात . वैचारिक शुद्धीकरण म्हणजे मी विशिष्ट उद्योग का करावा? उद्योगामागाची मूळ बैठक काय असावी? उद्योजकांकडून होणाऱ्या मुलभूत चुका अशा अनेक विषयावर आपण विचार केला?

यापुढील लेख आपण उद्योगसंस्था कशी उभी करायची यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हा विषय आपणासमोर मांडण्यासाठी लेखांची एक शृंखला आपणासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न .

Define your play Ground. / तुमची खेळपट्टी निश्चित करणे.

उद्योग क्षेत्र निवडणे :

नवोदित उद्योजक म्हणून आपण जेव्हा उद्योग सुरु करण्याचे ठरवतो तेव्हा आपला ज्या विषयाचा अभ्यास आहे, ज्यात आपल्याला रस आहे , ज्या कामाचा अनुभव आहे किंवा आपल्या मित्रपरिवारात कोणी तरी ज्या industry मध्ये उद्योग करतोय त्या क्षेत्रात उद्योग करायचे आपण ठरवतो . वास्तविकता असेच करणे अधिक फायद्याचे ठरते . ज्या क्षेत्राची काहीच माहिती नाही किंवा आपल्याला ज्यात रस नाही अशा क्षेत्रात उद्योग करणे टाळावे.

सुरवातीच्या लेखांनंतर मला अनेक तरुणांचे फोन आले त्यांच्या बोलण्याचा रोख काहीसा असा होता . आम्हाला उद्योगाचे ज्ञान नाही, अनुभव नाही , आणि आमचा रस कशात आहे हेही माहित नाही अशावेळी आम्ही काय करावे.

अशा परिस्थितीत ( ज्ञान ----> अनुभव ----> प्रयोग ) हि साखळी पाळणे सोयीस्कर ठरते. अज्ञानात उचलेल्या पाउल पश्चातापाचे कारण बनू शकते .

उद्योग क्षेत्राची निवड झाली म्हणजे आपली खेळपट्टी निश्चित झाली असे मुळीच नाही. आपण निवडलेल्या क्षेत्रात मी माझा उद्योग नक्की कुठे करणार ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच खेळपट्टी निश्चित करणे.

उदाहरणार्थ : समजा एखाद्याने Real Estate हे क्षेत्र निवडले , या क्षेत्रातही (Residential , Commercial , Industrial तसेच construction , plotting, Affordable , Midsize ,Luxury ) असे अनेक प्रकार व त्याची अनेक combinations असतात. मी Real Estate मध्ये आणि या क्षेत्रातील सर्वकाही करु शकतो, जशी संधी मिळेल ते सर्व करूया हा चुकीचा विचार अहे. "Dont be opportunist by default but be opportunist by design "

भविष्यात फक्त specialization उपयोगाचे नाही तर Hyper specialization चे दिवस येताहेत अशावेळेस तुम्ही ठरवलेली उद्योगाची विशिष्ठ खेळपट्टीच तुम्हाला स्वयं विकसित होणारा उद्योग उभा करायला मदत करेल . वर दिलेल्या उदाहरणात जर खेळपट्टी शोधायची झाली तर पुढील प्रमाणे hyper specializations होऊ शकतात.

१ Residential Affordable Plotting company 

२ Residential Midsize Plotting company 

३ Residential High end Plotting company 

४ Affordable residential housing company 

५ Midsize residential housing company 

६ Luxury residential housing company 

७ industrial plotting company 

८ Farmland plotting company

अशा प्रकारचे अनेक hyper specialization एका क्षेत्रात असू शकतात. अनेक उद्योजक त्यांच्या समोर येणाऱ्या संध्यांमुळे स्वतःचे hyper specialization विसरतात व अशा खेळपट्टी वर खेळण्याचा प्रयत्न करतात जिथे खेळण्यासाठी लागणारी संसाधने त्यांच्याकडे नसतात आणि उद्योगातील एक मोठी चूक करतात , हि चूक म्हणजे hazard blindness.

hazard blindness हा एक असा आजार आहे ज्यामध्ये संधी तर दिसते पण त्या संधी बरोबर येणारी जोखीम मात्र दिसत नाही.

स्वतःची खेळपट्टी जाणून खेळणाऱ्या काही उद्योगांची उदाहरणे .

Linkedin जरी Social networking क्षेत्रात असले तरी professional networking याच खेळपट्टीवर सातत्त्याने काम करताहेत. हिरानंदानी real estate क्षेत्रात फक्त luxury हौसिंग क्षेत्रातच काम करतात , त्यातही township निर्माण करणे हि खेळपट्टी त्यांनी स्वीकारली आहे . हिरानान्दानीची सिंगल बिल्डींग क्वचितच आढळेल . आणि तशी त्यांनी बांधण्याचा प्रयत्न जरी केला तर तो प्रोजेक्ट त्यांच्या दृष्टीने खूप यशस्वी होईल असे वाटत नाही.

एकदा तुमची खेळपट्टी निश्चित झाली कि त्या अनुशंघाने संसाधने , कार्यपद्धती तयार करता येतात . अशापद्धतीने उद्योजक जेव्हा उद्योग चालवण्या ऐवजी उभारण्यासाठी एक मजबूत बैठक बनवतो तेव्हा काही काळातच स्वयंचलित व स्वविकासित होणारा उद्योग तो नक्कीच उभा करू शकतो .

- by कुंदन गुरव........................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात. - Article by कुंदन गुरव

पुढच्यास ठेस मागचा शहाणा

आजच्या सातत्याने बदलणाऱ्या आर्थिक जगात, नोकरी हि व्यवसायापेक्षाही अनिश्चित झाली आहे. तुम्हाला केव्हा नोकरीचा राजीनामा द्यायला सांगतील याची शाश्वती नाही . बर्याचदा अगदी नोकरी सोढावी नाही लागली तरी नोकरीत काही अशी कामे करायला भाग पाडले जाते जे करण्याची तुमची इच्छा नसते अथवा मानसिकताही नसते . अशावेळेस स्वप्नातला जॉब मिळावा अशी अशा करणे म्हणजे मृगजळामागे धावण्यासारखेच आहे. आपल्या पैकी अनेकांना ह्या सत्याची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच अनेक तरुण नोकरीचा विचार सोडुन उद्योग्धन्द्याला प्राधान्य देताना दिसतात.

वरवर पाहता स्वमालाकीचा उद्योग हा फायदेशीर आणि अधिक फलदायी वाटतो खरा पण याचा अर्थ असा मुळीच नाही कि तुम्ही जे काही कराल त्या सगळ्यात यशस्वीच व्हाल. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तुम्हीही छोट्या मोठ्या चुका जरूर कराल आणि या चुकांचं भुर्दंड हि तुम्हाला भरावा लागेल. अगदी चुकाप्रूफ उद्योग करता येणार नसला तरी अनुभवी उद्योजकांकडून शिकून अनेक चुका टाळता येण्यासारख्या नक्कीच आहेत. अशी लोकं ज्यांनी परिश्रमातून, प्रयत्नातून, चुका करून आणि त्या सुधारून उद्योग यशस्वीरीत्या उभे केलेत अशा लोकांचे अनुभव नवीन उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक ठरतात.

सामान्यतः पुढील सात चुका बहुतेक नवीन उद्योजक करतात. पहा या चुकांबद्दल वाचताना डोक्यात घंटी वाजते का . सर्वात महत्वाच म्हणजे या चुका कशा टाळता येतील ते शिकून घ्या आणि उद्योजक म्हणून यशस्वी हेण्याचे तुमचे चान्सेस वाढवा .

१) सुस्पष्ट ध्येय आणि उधिष्ट नसणे.

उद्योजक म्हणून सर्वात मोठी घोडचूक जर काही असेल तर सुनिश्चित ध्येय नसणे . रिसर्च असा सांगते कि अनेक उद्योजक परिणामांचा विचार न करता उद्योगात उतरतात. त्यांना काय सध्या करायचे हे तर माहित नसतेच परिणामी कसे सध्या कार्याचे हे हि काळात नसते . नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला हे माहित असणे फार गरजेच आहे कि तुमच्या उद्योगाचे यश हे तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर मोठ्याप्रमाणावर अवलंबून असते . सुरुवातीपासूनच तुमच्या उद्योगाने तुम्हाला काय सध्या करून दिला पाहिजे याचा आराखडा तुमच्या कडे असणे गरजेचे आहे. हा आराखडा तुमच्या डोक्यात असून चालणार नाही तो कागदावर तपशीलवार मांडला पहिजे. जर तुम्हाला तुमच्या शहरातील सर्वात मोट्टी restaurant chain उभी करायची असेल तर बसून वेळ वय घालवून चालणार नाही. कामाला लागावं लागेल . मेहनतीची पराकाष्ठा करून प्रथम तपशीलवार आराखडा मांडण्यासाठी लागणारी माहिती गोळा करावी लगेल. उद्योगाचा आराखडा मांडण्य साठी पुढील काही महत्वाच्या बाबींचा समावेश करणे गरजेच आहे.

o अल्पावधी आणि दीर्घावधी ध्येय्य 

o तुमचं उत्पाद किंवा सेवा 

o ग्राहक वर्ग 

o उत्पाद ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीची सूची 

o कामगारांच्या जबाब्दार्याचा गोषवारा Summary


२) आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष

मराठीत म्हण आहे " सगळ्या गोष्टींच ढोंग करता येत पण पैशाच ढोंग करता येत नाही " उद्योगासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळ उपलब्धता करण्यात जर अपयश आलं तर एक गोष्ट नक्की कि तुमचा उद्योग टेक ऑफ करणारच नाही. तुमच्या उद्योगाच्या भरभरासाठी भांडवल उभे करणे तितकेच महत्वाचे आहे जितके जगण्या साठी oxygen .

उद्योग सुरु करण्या आधीच आर्थिक पाठबळ कुठून मिळेल याची तरतूद करणे गरजेचे आहे. तुमच्या स्वतःकडे जर भांडवल नसेल तर financial पार्टनर शोधा. मित्रपरिवाराकडून मदत होते का ते पहा , पण भांडवलाच्या अभावात उद्योग सुरु करू नका . आपण भांडवला शिवाय व्यवसाय सुरु करून अतिशय यशस्वी झाल्याच्या प्रेरणा देणाऱ्या कथा ऐकतो. त्या एकतर खोट्या असतात किंवा तुम्हाला अर्धवटच सांगितल्या जातात. फक्त प्रेरणादायी कथांच्या आहारी जाऊ नका. भांडवलाच्या तरतुदीच्या मागे लागा. सुरवातीला तुम्हाला बँका अथवा financial institution भांडवल देणार नहित. एखादा angel गुंतवणूकदार पहा. अतिशय जास्त व्याजावर पैसे घेण्याऐवजी भाग भांडवलाच्या आधारावर पैसे उभे करता येतात का ते पहा . एकदा का भांडवलाची तयारी झाली कि मग प्रत्येक खर्चाचे व्यवस्तीत नियोजन करा . इतर बेजवाबदार तरुणांप्रमाणे पैशाचा अपव्यय टाळा. महागडे चष्मे, मोटार गाड्या आणि मैत्रिणींवर व्यवसायातला पैसा उधळू नका (अनुभवाचे बोल).

तुम्ही व्यवसायात नवीन असल्यामुळे तुम्हाला आधीच मोठ्या रकमा कशा हाताळायच्या हे माहित नसते त्यामुळे अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या . तुमचा उद्योग असला तरी पैसा उद्योगाचा आहे. अगदी सुरवाती पासूनच स्वतःला पगार द्या. वेळ पडली कि गल्ल्यात हात घालण्याची घाणेरडी सवय टाळा. तुमचा आणि उद्योगाचा पैसा वेगळा आहे हे सत्य नेहमी लक्षात असुद्या मग पहा उद्योग कसा आपोआप तुमची आर्थिक भरभराट करतो ती .

३) सुपरम्यान असल्यासारखे वागणे.

हे खरं आहे कि बहुतेक नवोदित उद्योजक सर्व कामं स्वतःच कुणाची मदत न घेता करण्याचा प्रयत्न करतात. हे कोणत्याही उद्योगासाठी घातक ठरू शकते. एक sustainable उद्योग उभा करणे हे खूप मोठ्ठे आव्हान आहे आणि हे एका माणसाचे काम नाही हे लक्षत असु द्या. त्यामुळे सर्वकाही स्वतः करण्याचे टाळा आणि तज्ञांची मदत घ्या .

स्वतःभोवती अनुभवी लोकांचे वर्तुळ निर्माण करा. कधीही मदत मागण्याची भीती व संकोच ठेवू नका. समविचारी लोकांबरोबर काम करण्याच्या संध्या शोधा किंवा निर्माण करा . जरी अनेकांकडून मदत आणि सल्ला मागत असलात तरी आंधळेपणाने कोणताही सल्ला पाळू नाका. मिळालेल्या सल्यावर विचार करा आणि मगच त्याचे अनुकरण करा . दुर्दैवाने उद्योग जगतात इर्षा, चढाओढ अशा गोष्टींचाही समावेश आहे त्यामुळे सदैव सतर्क रहाणेही गरजेच आहे .

४) अति लोभ

उद्योग सुरु करण्यामागे खूप पैसे कमावून श्रीमंत होणे हा एकमेव हेतू असेल तर अपयशी होणे कधीच टाळता येणार नाही . उद्योगात अति लोभी हेणे हि सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते. लोभ तुमचा उद्योग उभा करण्या ऐवजी तुम्हाला उध्वस्त करू शकतो . फक्त उद्योगातून किती पैसे उभे करायचे याच्यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी ग्राहकाला सर्वोत्तम सेवा कशी देता येयील , सहकाऱ्यांना कसे प्रेरित करता येईल, चांगले सहकारी कसे जोडता येतील, चांगल्या गुंतवणुका कशा करता येतील यावर लक्ष केंद्रित केले तर अपेक्षित श्रीमंती अनुषंगाने तुमच्याकडे आकर्षित होईल. तात्पर्य तुमचा व्यवसाय तुम्हाला सध्यपारीस्थितीत जे उत्पन्न देतोय त्यात समाधान मान आणि अति लोभ टाळा .

५) स्वतःच्या चुका न स्वीकारणे.

चुका करणे एक बाब तर त्या स्वीकारणे आणि सुधारणे दुसरी . मी चुकलो हे मान्य केल्याशिवाय त्या सुधारणे कधीच शक्य नाही. बहुतेक उद्योजक स्वतःच्या चुका मान्य करणे टाळतात . त्यांचा हा ठाम विश्वास असतो कि त्यांची मतप्रणाली, योजना आणि कार्यपद्धती सर्वोत्तम आहे आणि त्यावर कोणी बोट उचलता कामा नये. एखाद्या महत्वाच्या सल्ल्याकडे किंवा कल्पनेकडे या मुळे दुर्लक्ष केलं जातं आणि अपेक्षित सुधारणा आणि प्रगती होत नाही . अनेकदा स्वतःच्या चुकांचे खापर परिस्थितीवर अथवा इतर लोकांवर फोडले जाते , एकदा चुकांची जवाबदारी परिस्थितीवर टाकली कि स्वताला प्रश्न विचारायची गरज राहत नाही, पर्यायाने सिंहावलोकन (introspection) होत नाही.

६) उतावळेपणा

आकडेवारी प्रमाणे दरवर्षी ६०% उद्योग उतावळ्या उद्योजाकांमुळे बंद पडतात . उद्योग सुरु झाल्या झाल्या मोठ्या परिणामाची अपेक्षा उद्योगापासून ठेवली जाते. उतावळेपणा हा अतिशय घातक आजार आहे, जो उद्योगाला बाळसं धरण्याआधी आक्रमण करून संपवून टाकतो . नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे कि उद्योग रातोरात उभा राहत नाही . उद्योगात काही तत्व लक्षात घेणं गरजेच आहे "measurable progress in Reasonable Time " . शेतकर्याप्रमाणे पेरल्यावर उगवण्याची वाट पहावी लागते . दरम्यानच्या काळात निगा राखावी लागते . तुम्ही कितीही ओरडलात "उगव , उगव " तरी उगवायला जितका वेळ लागणार तितका लागणारच . उतावळेपणाने गरजेपेक्षा अधिक खात आणि केमिकल वापरलं तर sustainability कधीच साध्य होणार नाही .

७) ब्रांड न बनविणे.

अनेक नवोदित उद्योजक काम पूर्ण करण्यावर जास्त भर देतात आणि स्वतःच्या उद्योगाची एक स्पष्ट ओळख निर्माण करण्याचे विसरतात. तुम्ही उद्योग सुरु केल्या केल्या बरीच लोकं तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे उद्योगाची ओळख निर्माण करणे गरजेचे आहे परिणामी तुमचे संभावित ग्राहकांना स्पष्टपणे कळेल कि तुमच्याकडून काय अपेक्ष ठेवायच्या. एक चांगला ब्रांड फक्त तुमची विश्वसनीयता वाढवत नाही तर तुमच्या उद्योगाची तत्वप्रणाली ग्राहकांपर्यंत पोहोचवतो ज्यामुळे तुम्ही ग्राहकाच्या लक्षात तर राहातच पण ग्राहक देखील तुमच्याशी व्यवहार करायला प्रेरित होतो.

उद्योजक मित्रांनो मी अनुभवलेल्या काही गोष्टी या लेखाद्वारे आपणा पर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न. यातील सर्वच तुम्हाला पटेल असा आग्रह नाही. पण जे पटेल ते उद्योगात वापरा. हे उद्योगरूपी विश्वविद्यालय तुम्हाला जगण्याचा खरा आनंद देईल .

- कुंदन गुरव .............................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



तुमच्या उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्र रंगवा. - Article by कुंदन गुरव

“We can not go back in our past and start new beginning but we can think about, dream about and ultimately envision our own future so that we have a brand new ending."

२०० उद्योजकांच्या समूहासमोर हे वाक्य मी फेकले खरे, पण अर्ध्यापेक्षा अधिक लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव असहमतीदर्शक होता. त्यांच्या असहमतीचे कारण मला माहीत होते. कदाचित त्या कारणामुळेच हा सेमिनार आयोजित केला होता. हे सर्व उद्योजक महाराष्ट्रातील एका नामांकित आणि पंचतारांकित MIDC मधील होते. गेल्या दशकात या MIDC ने अतिशय भयावह असे अनुभव घेतले होते. इतले बहुतेक उद्योजक हे एका बलाढय उद्योग समूहासाठी OEM किंवा टियर वन सप्लायर होते. बाजारातील चढ-उतारामुळे या समूहाने Production बंद केल्यात जमा होते. अर्थव्यवस्थेतील मंदी आणि जवळपासच्या छोटया शहरांत झालेल्या विकासामुळे तयार झालेली स्पर्धा.

अशा या परिस्थितीत आजच्या समस्या एवढया मोठया वाटत होत्या की, भविष्याचा विचार करणे अथवा भविष्य घडवणे निरर्थक वाटत असावे. उद्योजक म्हणून कार्य सुरू केले की, प्रत्येकाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागतेच.जेव्हा आजच्या समस्या आभाळाहूनही मोठया असतात. अशा वेळी भविष्याचा विचार अथवा स्वप्न निरर्थक वाटतात खरे, पण याच वेळी भविष्याच्या सकारात्मक चित्राची सर्वात जास्त गरज असते. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपण सामोरे जात असणाऱ्या बहुतेक समस्यांचे कारण कुठे न कुठे भविष्याच्या सकारात्मक परिस्थितीचे चित्रण न करण्यातच दडलेले असते यावर माझा आता ठाम विश्वास बसला आहे.

असाच एक सेमिनार संपवून मी प्रश्नोत्तराच्या तासाला सामोरा जात होतो. त्या उद्योजकांच्या समूहात एक प्रौढ गृहस्थ बसले होते, त्यांनी उभे राहत मला प्रश्न टाकला, ``साहेब, तुम्ही सांगता आहात ते सगळे ऐकायला चांगले वाटते पण तुम्हाला उद्योगातील काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स माहीत नाहीत, सर्वात प्रथम तर आम्हाला चांगले कामगारच मिळत नाहीत, त्याचे काय?``

हा प्रश्न तसा माझ्यासाठी नवीन नव्हता, कारण रोज अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. शांतपणे प्रश्न ऐकल्यावर मी त्यांना विचारले, ``साहेब तुम्ही मला गेले दोन तास ऐकता आहात, मी आजपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केलेली प्रोजेक्टस् ही आपण ऐकलीत, त्यातील काही ब्रॅण्ड आपण स्वत: वापरलेत आणि अनुभवले आहेत, तुम्ही मला चांगल्या कामगारांमध्ये मानता का?`` त्याचे उत्तर हो म्हणून आले. मी म्हटले, ``या दोनशे लोकांसमोर मी आपणास विचारतो मी जर आपल्या कंपनीत सांगाल त्या वेतनावर काम करायला तयार झालो तर आपण मला नोकरी द्याल का?`` थोडया संकोचाने पण ते म्हणाले, ``आनंदाने``. मग मी त्यांना विचारले, ``साहेब. मला सांगा तुमच्याबरोबर काम केल्यावर पाच वर्षांत मी कुठे असेन? माझ्या लाईफ मध्ये असे काय काय घडले असेल?`` उत्तर लगेच आले, ``तुमची प्रगती झाली असेल`` पण या उत्तराची फोड करून सांगा म्हटल्यावर मात्र उत्तर आले नाही.

मी म्हटले, ``साहेब माझे सोडा पण आपली कंपनी पुढच्या पाच वर्षांत कुठे असेल, कशी असेल याचा आराखडा आहे का आपल्याकडे.`` प्रांजळपणे नकारार्थी मान डोलवत साहेब खाली बसले पण बसताना अंतर्मुख होऊन विचारमग्न झाले. साहेबांची माफी मागत मी समूहाशी संवाद चालू ठेवला. चांगल्या कामगारांना हवे असते भविष्य, उद्योजक म्हणा अथवा लीडर म्हणा त्यांना तुमच्याकडून उद्याच्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात. ही उत्तरे जर समर्पक द्यायची असतील तर बिजनेस प्लानची गरज पडते पण हा बिजनेस प्लान भविष्याच्या सकारात्मक चित्रावाचून बनूच शकत नाही.

बँकेला देण्यासाठी अथवा अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी का लोक बिजनेस प्लान बनवून घेतात जर हा बिजनेस प्लान भविष्याच्या सकारात्मक चित्रावर आधारित नसेल तर दीर्घ कालावधीमध्ये घातक ठरतो. उद्योजकता या विश्वविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शिकलेल्या काही प्राथमिक धडयांपैकी एक म्हणजे `भविष्याची सकारात्मक प्रतिमा` तयार करण्याची कला. यालाच आजच्या जगात व्हिजन शोधणे अथवा बनवणेही म्हणतात. आज व्हिजन हा शब्द अतिशय सर्रासपणे औद्योगिक जगात वापरला जातो. अनेकांना व्हिजन म्हणजे प्रेरणा देणारे एक वाक्य वाटते तर काहींना कार्यालयात, व्हिजिटिंग कार्डवर अथवा ब्रोशरवर लिहायचे फॅन्सी वाक्य वाटते.

शंभराहूनही अधिक व्हिजन वर्कशॉप केल्यावर आजही हे वर्कशॉप करण्यापूर्वी माझ्या मनात भीती असते. प्रसवाच्या वेळी स्त्रीला होणाऱ्या यातना आणि डॉक्टरांनी घ्यायची काळजी या दोन्हीचा समावेश व्हिजन शोधण्याच्या मोहिमेत असतो. बालकाच्या वाढीतला त्याचा जन्म जितका महत्त्वाचा टप्पा तसाच उद्योगाच्या वाढीत व्हिजनाचा शोध अथवा बनवणे. व्हिजनचे महत्त्व फक्त उद्योगातच नाही तर या जगात प्रत्येक गोष्टीला लागू आहे. व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, देशांच्या आणि उद्योगाच्या प्रगतीमध्ये व्हिजनचा मूलभूत सहभाग आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात जी व्हिजनचे महत्त्व पटवून देतात.

मराठयांचा इतिहास जर पाहिला तर राजा रामदेवराय यादवापासून ते शिवाजींच्या जन्मापर्यंतचा काळ हा अतिशय हलाखीचा, नामुष्कीचा आणि असह्य होता. राजा आणि प्रजा दोघेही आजच्या समस्यांशीच झुंजत होते. अत्याचार, बलात्कार, लूट आणि अतिरेक या सामान्य गोष्टी झाल्या होत्या. यातून आपली कधी सुटका होऊ शकेल, असे लोकांनाही वाटत नव्हते. लाचारीच जीवन जगावे अथवा आत्महत्या करावी अशा प्रकारचे जगणे होते. हा प्रकार तोपर्यंत चालला जोपर्यंत जिजाऊने भविष्याचे सकारात्मक चित्र शिवाजीच्या मनावर कोरले नाही.

स्वराज्याचे स्वप्न उरी घेऊन महाराजांनी घोडदौड सुरू केली. परिस्थिती काही अचानक बदलली नाही. अनेक जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. प्रत्येक वेळी दंडातील ताकद कामी आली असे नाही, पण एक ताकद कायम साथ देत होती ती म्हणजे स्वराज्याचे व्हिजन. 200 वर्षे गुलामीत राहिलेल्या समाजाला जागरूक करायला, मुजरे करायला सोकावलेल्या मनगटात शौर्याचा संचार घडवायला जर काही कामी आले तर स्वराज्याचे व्हिजन. स्वराज्याच्या व्हिजनच्या जोरावर, तुटपुंज्या साधनांच्या जोरावरही स्वराज्य घडलं. या व्हिजनला प्रत्यक्ष रूप देणारे अमर झाले. जन्म-मरणाचा फेरा चुकला. एक स्वाभिमानी समाज पुन्हा ताठ मानेने उभा राहिला.

जातीयवाद, प्रांतवाद, स्वार्थ आणि गुलामगिरीतील ब्रिटिश काळातील भारताला एकत्रित होऊन लढायला जर कुणी भाग पाडले असेल तर ते स्वातंत्र्याच्या सकारात्मक चित्राने. एकच व्हिजन घेऊन गांधी, सावरकर, भगतसिंग आणि सुभाष बाबू वेगवेगळया पध्दतीने लढले. असह्य अशा वेदना सहन करूनही लढत राहायची ताकद होती कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अजून काही तरी खूप महत्त्वाचे करायचे बाकी होते. जोपर्यंत व्हिजन डोळयासमोर होते, आजच्या समस्या लहान वाटत होत्या. मार्ग सापडत होते, कोंडी फुटत होती. स्वातंत्र्य मिळाले आणि देशाने नवीन व्हिजन शोधलेच नाही म्हणून पुन्हा वाटचाल लाचारीची, स्वार्थाची, प्रांतवादाची आणि नैराश्याची झाली. पुन्हा व्हिजन शोधण्याची गरज आज देशाला आहे.

आपण म्हणाल यात कॉर्पोरेट चर्चा कुठे आहे? ज्याप्रमाणे अनेक उद्योजक आजच्या समस्यांवर लक्ष केंद्रित असतात व अनेक यत्न करूनही मार्ग सापडत नाही, किंवा जर आणखी प्रगती केली तर माझ्यासमोर येणारी आव्हाने मी कशी पेलणार, असा विचार करत असतील तर त्यांनी वरील दोन्ही उदाहरणांचा सखोल अभ्यास करावा, उत्तर सापडेल व्हिजनच्या शोधातच. व्हिजन या विषयाचा अभ्यास करताना माझा ठाम विश्वास झालाय, आपल्यापैकी प्रत्येक जण व्हिजनने pregnant आहे. या जगात आल्यावर त्या व्हिजनला प्रत्यक्ष रूप देणे हाच मुक्तीचा एकमेव मार्ग.

व्हिजनला प्रत्यक्ष रूप देण्याची संधी ही प्रत्येक उद्योजकाकडे आहे. उद्योजकतेच्या विश्वविद्यालयातील हा आणखी एक महत्त्वाचा धडा. असे अनेक काही धडे आपणासमोर पुढील काही लेखात आणण्याची इच्छा आहे. तोपर्यंत तुमच्या उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्र रंगवा.

- कुंदन गुरव .............................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



उद्योजकता या विश्वविद्यालयातील माझे प्राथमिक धडे. - Article by कुंदन गुरव

स्वतःचा शोध घ्या.

'साहब जमीन आप के कंपनी के नाम हो गई` रजिस्ट्रारने कागदावर मोहर लावत सांगितले. माझ्या अंदमान द्वीपसमूहातल्या प्रोजेक्टसाठी १५ एकर जमिनीचं खरेदीपत्र आज झालं. या जमिनीत हर्बल प्लांटेशनच्या प्रोजेक्टची सगळी तयारी पूर्ण झाली. साईट ऑफिसमधून समुद्रकिनारा दिसतो, समुद्राकडे पाहत असताना आजपासून १५ वर्षांपूर्वी आमच्या कोकणातल्या घरात झालेला एक संवाद आठवतो, पाहा काही साम्य आढळतंय का?

`मी व्यापार करणार` असं म्हटल्यावर आमचे काका धाडदिशी उभे राहिले आणि अक्षरश: ओरडलेच, `आपला विटांचा कारखाना होता, गावातली जमीन विकावी लागली, आता तुम्ही व्यापार करा म्हणजे राहतं घरही जाईल. हा असा संवाद मराठी माणसासाठी काही नवीन नाही.` भली नोकरी करावी, गाठीला काही पैसे जमवावेत, कुठे एखादी एफडी करावी, जमल्यास गावी एखादं छोटेखानी घर बांधावं आणि निवांत जीवन जगावं हे अगदी सोपं आणि साध जीवनाचं गणित आपण शिकलो आणि शिकवत आलो.

आमच्या व्यापाराची पहिली पाच वर्षे अतिशय कठीण होती. आमच्या काकांची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंगपासून कुरीअर कंपनीपर्यंत बरेच व्यापार पाच वर्षांत करून पाहिले. प्रत्येक वेळी बॅलन्सशीटला तोटाच आला.

३१ डिसेंबर १९९९ च्या रात्री सगळं जग नवीन शताब्दीच्या स्वागताला सज्ज झालं होतं, मी मात्र माझ्या कुर्ल्याच्या घरात माळयावर एकटाच बसलो होतो, बसलो होतो म्हणण्याऐवजी लपलो होतो म्हणायला हरकत नाही. व्यापार बुडीत निघाला होता, नवीन व्यापार म्हटला तर भांडवल उरलं नव्हतं, पतही गमावून बसलो होतो. नोकरी करण्याचा मार्ग तेवढा अजून खुला होता. मनाचा निर्धार होत होता नोकरीच करावी, सगळं कर्ज हळूहळू फेडावं, चारचौघांसारखं सरळ जीवन जगावं, अजून किती वणवण करायची, आणि एवढी मेहनत करून पदरी काय तर कर्ज, नामुष्की आणि मित्रपरिवाराच्या सहन न होणाऱ्या नजरा.

माझे बहुतेक मित्र नोकरीला लागले होते काहींना तर सरकारी नोकरी लागली होती. बाबांच्या मते ते सेटल झाले होते. विचारांचा नुसता कोलाहल चालला होता, उद्या पहिला बायोडेटा तयार करायचा आणि नोकरीच्या शोधाला लागायचं, असा विचार पक्का झाला.

आतला रक्तबंबाळ झालेला, अगदी हिरमुसलेला उद्योजक शेवटची धडपड करत काहीतरी कुजबुजत होता, `थोडा शांत हो, विचार कर, गेल्या पाच वर्षांचा आढावा घे` माझ्यातल्या उद्योजकाचं शेवटचं एकदा ऐकायचं मी ठरवलं. वही-पेन घेऊन पाच वर्षांतल्या अनुभवांचा जमाखर्च मांडायला बसलो, एक एक वर्ष, प्रत्येक व्यापार, फ्लॅशबॅकप्रमाणे समोर आला. पहिल्यांदाच मी स्वत:ला त्रयस्थाच्या नजरेने पाहत होतो. गवर्ष्ठि, हट्टी, चंचल, लोभी अशी अनेक रूपं माझी मला दिसली, मी असा आहे यावर विश्र्वासच बसेना. माझे अनेक निर्णय कसे आत्मघातकी होते हे लक्षात आलं.

स्वत:तले दोष पाहनू दु:ख होण्याऐवजी आत्मविश्वास वाढत होता, विषण्णता दूर होऊन नवी उमेद दिसत होती. नोकरीचा विचार पळून गेला. मला काय करू नये हे कळंत होतं. त्या रात्री उद्योजकतेच्या काही नैसर्गिक तत्त्वांचा जणू साक्षात्कार झाला. हा साक्षात्कार माझ्यातला मीच घडवत होतो. रात्री युरेका, युरेका ओरडावेसे वाटले. कदाचित आरडलोदेखील असेल. नव्या शतकाच्या जल्लोषात ते इतरांना कळलं नसेल. त्या एका रात्रीतल्या स्वपरिचयाच्या जोरावर आजपर्यंतचा प्रवास सुरू आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, इंदौर आणि अंदमान येथे बिझनेस कंसल्टिंग, हेल्थ सप्लिमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असे व्यापार चालू आहेत.

अजून स्ट्रगल आहेच पण गहाळ होऊन नोकरीचा विचार मात्र मनात येत नाही. लोकांच्या नजरेत भरावं एवढं यश काही अजून प्राप्त झालं नाही, पण प्रवास चालू आहे, अजूनही काही मित्र सशंक नजरेने पाहतात, वेळ प्रसंगी सल्लाही देतात. आता सवय झालीय.

त्या रात्री मला उमगलेली महत्त्वाची गोष्ट:

अॅक्शन / रिफ्लेक्शनचे तत्त्व

आत्तापर्यंत व्यापारात कृतीला महत्त्व देऊन जे पुढे येईल त्यावर कृती करत जाणं हेच मला माहिती होतं. `केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे` हा समर्थांचा उपदेश संदर्भ समजून न घेताच मी पळत होतो. कृतीनंतरचा परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे की नाही याचा कधी विचारही केला नाही. अपेक्षित परिणामांच्या दिशेने कृती करायची की कृती करून परिणामांची अपेक्षा करायची यातला नंतरचा मार्ग मी नेहमी स्वीकारला. इतर काय करतात आपणही तसंच करू, त्यांना नफा होतो ना मग आपल्यालाही होईल. माझे सुरुवातीचे काही व्यापार तर इतरांचा व्यापार चांगला चाललाय ना आपणही करून पाहू. बाह्य जगात आज काय चालतंय, कशाला जास्त मागणी आहे त्या गोष्टींचा आपण व्यापार करायचा, कुणी म्हटलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरमसाट पैसा आहे. आम्ही दुकान उघडलं, अरे कुरीअरमध्ये जास्त भांडवल लागत नाही आणि एकदा सेट झाला की पैसाच पैसा, की आमची कुरीअर कंपनी सुरू झाली. तब्बल पाच वर्षे बाह्य जगावर लक्ष केंद्रित करून अज्ञानाच्या पायावर व्यापाराची इमारत उभारत होतो, ती थोडी उभी राहायची आणि माझ्या डोळयांसमोर कोसळायची. पुन्हा नवीन प्रयत्न, नवीन कृती, नवीन उयापार हे दृष्टचक्र पाच वर्ष चाललं.

`बहु हिंडता सौख्य होणार नाही। शिणावे परी नातुडे हित काही।।विचार बरे अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवी वस्ती कीजे।`

त्या रात्री समर्थांचा हा श्लोक डोळयासमोर चमकला. या श्लोकाचा कुणी कसा अर्थ लावेल हे प्रत्येकाच्या मन:स्थिती, परिस्थिती आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण माझ्या त्या परिस्थितीत मला समजलेला अर्थ मला आजपर्यंत मार्गदर्शक ठरला. बाह्य जगाकडे पाहून जीवनाची वाटचाल केल्यास काही प्राप्त होणार नाही. जोपर्यंत स्वत:च्या अंतराचा शोध घेत नाही तोपर्यंत तुझ्या अस्तित्वाचं कारणच कळणार नाही. आता माझी शोधमोहीम सुरू झाली.

नव्या व्यापाराची नव्हे तर मी व्यापार का करावा याची. अंतर्मुख होऊन जेव्हा स्वत:ला एक मूलभूत प्रश्न विचारला तो म्हणजे माझ्या अस्तित्वाचे कारण काय? अनेकांना हा प्रश्न आध्यात्मिक वाटेल, उतारवयात विचारायचा प्रश्न, भौतिकातून अध्यात्माकडे वळताना विचारायचा प्रश्न. अनेकांना हा प्रश्न उतारवयात पडतो कारण त्यांनी हा प्रश्न योग्य वेळी विचारलेला नसतो.

स्वत:ला प्रश्न विचारणं आणि प्रश्न पडणं यात आयुष्य जगणं आणि आयुष्य घडवणं यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे. योग्य वेळी योग्य प्रश्न जर स्वत:ला विचारले नाहीतर आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देत जगणं म्हणजे आयुष्याला प्रतिउत्तर देत जगणं अशा लोकांबरोबर आयुष्य घडत जातं, हे लोक आयुष्य घडवत नाहीत.

माझ्या वाचनात आलेलं एक खूप महत्त्वाचं वाक्य मला इथे आठवलं `Quality of your life will depend of the quality of questions that you will ask` आणि मग अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, कोणताही नवा व्यापार सुरू करायचा असताना माझ्यातला जोश काही दिवसांत कमी का होतो? व्यापाराने माझ्या भौतिक गरजा पूर्ण कराव्यात, भरपूर पैसा कमवून द्यावा, प्रसिद्धी द्यावी, मानमरातब द्यावा अशा अपेक्षा ठेवल्यामुळेच काही काळात जोश थंडावतो हे लक्षात आलं. मग अनेक व्यापार गेल्या ५०० वर्षांपासून सुरू आहेत त्यांचे संस्थापक आता या जगात नाहीत तरीही ते व्यापार तेवढ्याच जोशात कसे चालले आहेत? हे आणि असे अनेक प्रश्न डोक्यात फिरू लागले.

मला कळून चुकलं, `तुला जे माहीत आहे तेच तुला माहीत आहे, जे तुला माहीत नाही ते तुला माहीत नाही, जेवढं माहीत करून घेशील तेवढ्याचं पटीने माहीत असलेलं वाढत जाईल. आणि माझा प्रवेश झाला एका अशा विश्वविद्यालयात जिथे पदवीदान सभारंभच नाही. आज दहा वर्षांच्या अभ्यासानंतर मी त्या विश्वविद्यालयाला उद्योजकता म्हणतो. स्वागत आहे तुम्हा सर्वांच या विश्वविद्यालयात.

उद्योजकता या विश्वविद्यालयातील माझे काही प्राथमिक धडे

तुम्ही कुठे आहात (फाइंड मी बटण)

हल्ली आपण GPRS वापरतो किंवा मार्ग शोधण्यासाठी Google Map वापरतो. Google Map मध्ये Find Me किंवा Current Location असं बटण असतं, हे दाबलं की संगणक आपल्याला झूम आऊट करून अंतराळात घेऊन जातो. संपूर्ण जगाचं दर्शन एका नजरेत घडवतो आणि मग हळूहळू झूम इन करत आपण ज्या ठिकाणी आहोत ती जागा नकाशावर दाखवतो. एकदा आपण कुठे आहोत हे कळलं की पुढचा मार्ग शोधणं सोपे होते. व्यापार सुरू करण्यापूर्वी स्वत:चा शोध घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

स्वत:बद्दलचं अज्ञान व्यापारात घातक ठरू शकतं, व्यापारात फक्त तुमचा पैसा लागलेला नसतो. तुमचा वेळ, तुमचं आणि परिवाराचं भविष्य, तुमच्या सहकाऱ्यांचं करिअर अशा अनेक गोष्टी पणाला लागतात. गमावलेला पैसा पुन्हा कमावता येतो पण या अदृश्य गोष्टी गमावल्या तर परत आणणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे व्यापारात पदार्पण करण्यापूर्वी एक स्वल्पिवराम घेऊन स्वत:चा शोध घेतल्याने तुमच्या उद्योगाचाच नाही तर संपूर्ण भविष्याचा पाया मजबूत होईल. असा पाया ज्यावर कितीही उंच इमारत उभी करू शकाल.

स्वत:चा शोध घेणं म्हणजे स्वत:बद्दलची जागरूकता निर्माण करणं. जागरूकतेला व्यापारी जगात खूप महत्त्व आहे. जागरूकपणे केलेल्या गोष्टी अपेक्षित परिणाम देतात आणि जरी अपेक्षित परिणाम नाही आले तरी त्याची जबाबदारी घेणं सोपं होतं. याउलट अज्ञानाने केलेलं कार्य चुकीचे परिणाम देतात आणि मग दोष कुणाला द्यायचा याच्यावर लक्ष केंद्रित होतं. जबाबदारी न घेता दुसऱ्यावर अथवा परिस्थितीवर दोष टाकला तर सुधारणा काय कराव्यात हे कळत नाही. पुन्हा पुन्हा त्याच चुका होण्याची शक्यता असते.

So press ‘find me’ button today. It will open whole new world of opportunities for you, there are such small, but important lessons in the university with no graduation ceremony.

I will be happy to share more my thoughts. Till then keep discovering yourself.

- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546